अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसुलातील तूट भरून काढण्यासाठी देशातील 14 राज्यांना 7,183 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत


महसुलातील तूट भरून काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षात राज्यांना आतापर्यंत एकूण 50,283.92 कोटी रूपयांचे अनुदान

2022-23 या आर्थिक वर्षात राज्यांना महसुलातील तूट भरून काढण्यासाठी एकूण 86,201 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार

Posted On: 06 OCT 2022 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने, राज्यांना महसुलातील तूट भरून काढण्यासाठीच्या, पोस्ट डिव्होल्युशन रेव्हेन्यू डेफिसिट - पीडीआरडी अनुदानाचा सातवा मासिक हप्ता म्हणून 7,183 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत केले. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार हे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 14 राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदानापोटी एकूण 86,201 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. आयोगाने शिफारस केलेले हे अनुदान व्यय विभागातर्फे राज्यांना 12 समान मासिक हप्त्यांमध्ये वितरीत करण्यात येते. ऑक्टोबर 2022 मध्ये देण्यात आलेल्या सातव्या मासिक हप्त्यानंतर राज्यांना 2022-23 मध्ये वितरीत झालेल्या अनुदानाची रक्कम आता 50,283 कोटी 92 लाख रुपये झाली आहे. 

राज्यघटनेच्या कलम 275 नुसार केंद्र सरकारतर्फे राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदान दिले जाते. हस्तांतरणानंतर राज्यांच्या महसूल खात्यातली तफावत भरून काढण्याच्या उद्देशाने वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यांना लागोपाठ अनुदान वितरीत केले जाते.

हे अनुदान मिळण्यासाठी राज्यांची पात्रता आणि 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी अनुदानाचे प्रमाण हे पंधराव्या आयोगाने राज्याच्या महसूल आणि खर्चाच्या मूल्यांकनातील तफावतीच्या आधारे निश्चित केले होते.

2022-23 या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाने ज्या राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदानाची शिफारस केली आहे ती पुढीलप्रमाणे आहेत: आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी शिफारस केलेल्या डिव्होल्युशन रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँटचा राज्यनिहाय तपशील आणि सातवा हप्ता म्हणून राज्यांना वितरीत करण्यात आलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे:

(Rs in crore)

S. No.

Name of State

7th instalment released for the month of October, 2022.

Total PDRDG released to States during 2022-23.

1

Andhra Pradesh

879.08

6153.58

2

Assam

407.50

2852.50

3

Himachal Pradesh

781.42

5469.92

4

Kerala

1097.83

7684.83

5

Manipur

192.50

1347.50

6

Meghalaya

86.08

602.58

7

Mizoram

134.58

942.08

8

Nagaland

377.50

2642.50

9

Punjab

689.50

4826.50

10

Rajasthan

405.17

2836.17

11

Sikkim

36.67

256.67

12

Tripura

368.58

2580.08

13

Uttarakhand

594.75

4163.25

14

West Bengal

1132.25

7925.75

 

 

* * *

M.Pange/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865602) Visitor Counter : 216