संरक्षण मंत्रालय
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
Posted On:
05 OCT 2022 8:18PM by PIB Mumbai
आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस सारथी या जहाजांचा समावेश असलेली पहिली ट्रेनिंग स्क्वॉड्रन (1TS) 04 ऑक्टोबर 22 रोजी पोर्ट अल-शुवैख, कुवेत येथे दाखल झाले. ही जहाजे आपल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून पर्शियन आखाताला भेट देत आहेत.
कुवैती नौदल दलातील वरिष्ठ अधिकारी, सीमा सुरक्षा दल, भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि शाळकरी मुलांनी या जहाजांचे भव्य स्वागत केले. या जहाजांच्या तीन दिवसांच्या बंदर भेटीमध्ये व्यावसायिक चर्चा, परस्परांच्या जहाजांना भेटी, स्थानिक समुदायाबरोबर भेट आणि सामाजिक संवाद अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रनची जहाजे कोची येथे स्थित भारतीय नौदलाच्या प्रशिक्षण कमांडच्या दक्षिणी नौदल कमांडचा भाग आहेत.
प्रशिक्षणार्थींना समुद्रातील विविध प्रकारच्या घडामोडी आणि बंदरांचा परिचय करून देणे हे फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रनच्या भेटीचे उद्दिष्ट आहे. या भेटीमुळे प्रशिक्षणार्थींना देशाच्या सागरी क्षेत्रातील शेजारील मित्र राष्ट्रांशी भारताचे सामाजिक राजकीय, लष्करी आणि सागरी संबंध जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865424)
Visitor Counter : 221