संरक्षण मंत्रालय
भारत- इंग्लंड यांच्यातील संरक्षण सल्लागार गटाच्या बैठकीचे संरक्षण सचिवांनी भूषवले सहअध्यक्षपद
Posted On:
04 OCT 2022 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि इंग्लंडचे संरक्षण सचिव डेविड विलियम्स यांच्या संयुक्त सह-अध्यक्षतेखाली 3 ऑक्टोबर 2022 रोजी भारत-इंग्लंड यांच्यातील संरक्षण सल्लागार गटाची (DCG)लंडन इथे बैठक झाली.
या बैठकीत दोन्ही अधिकाऱ्यांनी उभय देशांमधील विविध द्वीपक्षीय गटांच्या चर्चा आणि इतर संरक्षण सहकार्य यंत्रणेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या संरक्षण तसेच औद्योगिक सहकार्याशी संबंधित व्यापक मुद्यांवर डॉ अजय कुमार यांनी यावेळी चर्चा केली. तसेच, संरक्षण उद्योग सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी नव्या मार्गांचा विचार करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, सायबर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या नव्या क्षेत्रांवरही यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रित काम करण्याची काटिबद्धता यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर, संरक्षण सचिवांनी इंग्लंडचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सर टीम बॅरो यांच्याशीही द्वीपक्षीय चर्चा केली. यावेळी संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865148)
Visitor Counter : 190