उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2022 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे -

''संपूर्ण भारतात पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि आनंदात साजरा होणाऱ्या दसऱ्याच्या शुभ प्रसंगी मी सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो.

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा हा सण, 'धर्म' किंवा धार्मिकतेवरील आपली श्रद्धा आणखी दृढ करतो. प्रभू श्रीरामाच्या अंगी असणाऱ्या सत्य, न्याय, करुणा, कर्तव्य आणि धैर्य अशा सद्गुणांचे स्मरण करण्याचा आणि त्यापासून प्रेरणा घेण्याचा हा सण आहे.

हा सण देशात शांतता, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येवो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो."

या संदेशाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवादासाठी येथे क्लिक करा

 

* * *

M.Pange/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865128) आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil