विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विशिष्ट अवयवावर उपचार करण्यासाठी सुवर्ण सूक्ष्मकण वापरुन केलेली पद्धत कर्करोग व्यवस्थापन आणि उपचारात सुधारणा घडवू शकेल
Posted On:
04 OCT 2022 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
औषध रुग्णांच्या शरीरात गेल्यानंतर विशिष्ट अवयवावर उपचार करण्यासाठी सुवर्ण सूक्ष्मकण वापरुन केलेली पद्धत, कर्करोगावरील उपचारांत सुधारणा घडवू शकते, असे एका संशोधनात आढळले आहे.
सध्या कर्करोगाचे 200 पेक्षा जास्त प्रकार ज्ञात असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि किरणोत्सर्ग अशा प्रकारचे उपचार केले जातात. यापैकी अनेक प्रकारच्या कर्करोगांचे लवकर निदान झाल्यास आणि योग्य उपचार झाल्यास, ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी आज उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती वेळखाऊ आणि महागड्या आहेत, त्याशिवाय त्यांचे इतर दुष्परिणाम देखील बरेच असल्यामुळे या उपचारांचा कर्करुग्णांवर हवा तेवढा प्रभावी परिणाम दिसून येत नाही.
हे लक्षात घेऊन राजस्थानच्या जयपूरमधल्या एमिटी विद्यापीठातील संशोधकांनी उपचारात मदत करणारे काही मध्यस्थ घटक शोधून काढले आहेत. त्यांनी नॅनो-जीवतंत्रज्ञानाचा वापर करुन, सुवर्ण-सूक्ष्मकण युक्त घटक विकसित केला आहे, ज्याच्या वापरामुळे शरीरातील विशिष्ट जागी औषधाचा प्रभावी परिणाम जाणवू शकेल. यामुळे कर्करोग व्यवस्थापन आणि त्यावर उपचार करणे सुलभ होईल.
अॅमिटी सेंटर फॉर नॅनोबायोटेक्नॉलॉजी अँड नॅनोमेडिसीन – ACNN मधले डॉ. हेमंत कुमार दायमा, डॉ. अखेला उमापती आणि प्रा. एस. एल, कोठारी यांनी हे ‘गोल्ड नॅनोपार्टिकल” द्रावण विकसित केले असून, त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण पृष्ठभाग आहे, ज्यात बायोमॉलिक्युलस आणि प्रतिजैविके आहेत, जी सुधारित कर्करोगरोधी क्रियांसाठी उपकारक ठरतात. हा घटक प्रतिबंधात्मक ऑक्सीजन प्रजातीची - आरओएसची निवड करतो. याच्या चाचण्यांच्या निष्कर्षावरून असे स्पष्ट झाले आहे की या औषधाच्या पृष्ठभागावरील कोरोना निवडक पद्धतीने कर्करोगाच्या प्रभावी उपचारासाठी आवश्यक आहे.
चांदीच्या सक्रिय नॅनोपार्टिकल्सचा वापर करून फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पेशींवरही या संशोधनाचा प्रयोग करण्यात आला. चांदीच्या नॅनोकणांच्या पृष्ठभागाच्या रासायनिक प्रक्रियेतून प्राप्त होणाऱ्या विशिष्ट कर्करोग-रोधी प्रभावाबाबतचे संशोधन “कोलॉइड्स अँड सरफेसेस ए: फिजिओकेमिकल अँड इंजिनीअरिंग ऍस्पेक्ट्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनात दोन्ही अभ्यासकांनी सक्रिय नॅनोकणांच्या कर्करोगविरोधी कृतींच्या यंत्रणेबद्दल सविस्तर माहिती प्रदान केली आहे. सक्रिय नॅनोकण हे कर्करोग विरोधी यंत्रणेसाठी सहायक असल्याचा निष्कर्ष दोन्ही अध्ययनातून प्राप्त झाला आहे.
हे संशोधन म्हणजे जपानच्या मियाझाकी विद्यापीठातील संशोधकांच्या सोबतीने करण्यात आलेला एक जागतिक प्रयत्न होता आणि ऑस्ट्रेलिया आरएमआयटी विद्यापीठ त्यात सक्रिय सहभागी होत आहे. आता संशोधकांचा चमू तयार केलेल्या नॅनोकणांचा रासायनिक अभ्यास करणार आहेत.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चर - FIST कार्यक्रमाच्या सुधारणेसाठीच्या निधीतून प्राप्त फूरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी - FTIR, फ्लोरोसेंट मायक्रोस्कोपी सुविधांवर सोन्याच्या नॅनोकणांचे काही महत्त्वाचे भौतिक-रासायनिक वैशिष्ट्य जाणून घेणारे तसेच जैविक अध्ययन करण्यात आले. या अभ्यासामुळे कर्करोगाच्या उत्तम व्यवस्थापन आणि उपचारासाठी नवीन संधी उपलब्ध होतील तसेच भविष्यातील नॅनोमेडिसिनसाठी आणि कर्करोगाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांचाही मार्ग मोकळा होईल.
प्रबंध बघण्यासाठी इथे क्लिक करा:
https://doi.org/10.1016/j.colsurfa.2020.125484
https://doi.org/10.1016/j.colsurfa.2022.129809
- The solutions of curcumin synthesized gold nanoparticles, (b) after their surface functionalization with isonicotinic acid hydrazide.
Researchers using the DST-FIST supported Fluorescent Microscopy facility.
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865125)
Visitor Counter : 233