संरक्षण मंत्रालय
संजीव किशोर यांनी नवीन महासंचालक - आयुध निर्माण म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2022 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
भारतीय आयुध निर्माण सेवेचे – IOFS चे 1985 च्या तुकडीचे अधिकारी संजीव किशोर यांनी 01 ऑक्टोबर 2022 पासून एम. के. ग्रॅग यांच्या सेवानिवृत्तीनंतर महासंचालक आयुध निर्माण - C&S म्हणून पदभार स्वीकारला आहे. महासंचालक - C&S पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजीव किशोर, कोलकाता येथे आयुध संचालनालय (समन्वय आणि सेवा) येथे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते.

भारत सरकारने 2021 साली संरक्षण क्षेत्रात स्थापन केलेल्या सात नवीन सार्वजनिक उपक्रमांपैकी एक असणाऱ्या आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड - AVNL च्या पहिल्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदाबरोबरच इतर अनेक वरिष्ठ पदांवर कार्य करण्याचा अनुभव संजीव किशोर यांना आहे. आयुध निर्माण कारखाना मंडळाचे व्यावसायिक व्यवस्थापन असणाऱ्या सात सरकारी विभागांचे कॉर्पोरेट कंपन्यात रुपांतर करण्याच्या कामात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली AVNL ने सुरूवातीच्या सहा महिन्यामध्ये नफा नोंदवला.
मुख्य व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी तामिळनाडू मधील अवडी येथील अवजड वाहने कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि डेहराडून येथील ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक म्हणून संजीव किशोर यांची नियुक्ती झाली होती.
त्यांनी अनेक पदांवर कार्य केले असून त्यांना वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. संरक्षण उत्पादन वाढविण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना संतू सहाने मेमोरियल शिल्ड आणि आयुध भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
M.Pange/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1865072)
आगंतुक पटल : 319