भारतीय निवडणूक आयोग

महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधल्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान, मतमोजणी 6 नोव्हेंबरला

Posted On: 03 OCT 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा इथल्या  रिक्त विधानसभा मतदारसंघाच्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 166-अंधेरी पूर्व मतदारसंघात गुरुवार, 3 नोव्हेंबर, 2022 रोजी मतदान होणार असून मतमोजणी रविवारी, 6 नोव्हेंबर , 2022 रोजी होईल.

Sl. No.

Name of State

Assembly Constituency No. & Name

  1.  

Maharashtra

166-Andheri East

  1.  

Bihar

178-Mokama

  1.  

Bihar

101-Gopalganj

  1.  

Haryana

47-Adampur

  1.  

Telangana

93-Munugode

  1.  

Uttar Pradesh

139-Gola Gokrannath

  1.  

Odisha

46-Dhamnagar(SC)

 

पोट-निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

Schedule for Bye-election for Assembly Constituencies

Poll Events

Schedule

 

Date of Issue of Gazette Notification

7th October, 2022

(Friday)

Last Date of Nominations

14th October, 2022

(Friday)

Date for Scrutiny of Nominations

15th October, 2022

(Saturday)

Last Date for Withdrawal of candidatures

17th October, 2022

(Monday)

Date of Poll

3rd November, 2022

(Thursday)

Date of Counting

6th November, 2022

(Sunday)

Date before which election shall be completed

8th November, 2022

(Tuesday)

 

मतदार यादी

01.01.2022 रोजीच्या उपरोक्त विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरल्या जातील.

 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपीएटी

निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपीएटी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रांवर पुरेशी मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपीएटी  असतील याची खात्री केली जाईल.  या उपकरणांच्या साहाय्याने  मतदान सुरळीत पार पडावे यासाठी सर्व पावले उचलण्यात आली आहेत.

 

मतदारांची ओळख

मतदारांचे छायाचित्र असलेले  ओळखपत्र   (EPIC) हे मतदाराच्या ओळखीचे मुख्य दस्तऐवज असेल. मात्र , खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवले जाऊ शकते:

  1. आधार कार्ड,
  2. मनरेगा जॉब कार्ड,
  3. बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक,
  4. श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  5. ड्रायव्हिंग लायसन्स,
  6. पॅन कार्ड,
  7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अंतर्गत भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्या  द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड,
  8. भारतीय पासपोर्ट,
  9. छायाचित्रासह निवृत्तीवेतन कागदपत्र ,
  10. केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे,
  11. खासदार/आमदार/विधान परिषदेचे सदस्ययांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे.
  12. युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार


आदर्श आचारसंहिता

ज्या जिल्ह्यात (जिल्ह्यांमध्ये) निवडणुक होणाऱ्या   संसदीय/विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण किंवा कोणताही भाग समाविष्ट असेल, तिथे तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता  लागू होईल, दिनांक 29 जून, 2017 रोजी आयोगाच्या सूचना क्र. 437/6/1NST/2016-CCS,  द्वारे जारी केल्यानुसार आंशिक सुधारणांच्या अधीन. (आयोगाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध)

 

गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित माहिती

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना यासंबंधी निवडणूक प्रचाराच्या कालखंडात एकूण तीन वेळा वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्त वाहिन्यांवरून जाहीर माहिती द्यावी लागेल. ज्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला आपल्या पक्षाची उमेदवारी दिली असेल, त्या पक्षाला देखील त्यासंबंधीची माहिती एकूण तीन वेळा वृत्तपत्रांमध्ये व  वृत्त वाहिन्यांवरून आणि आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी लागेल.

आयोगाने  दिनांक 16 सप्टेंबर 2020  च्या पत्र क्रमांक 3/4/2019/SDR/Vol. IV नुसार  निर्देश दिले आहेत की नमूद केलेला कालावधी खालीलप्रमाणे तीन टप्प्यांसह  निश्चित केला जाईल, जेणेकरून मतदारांना अशा उमेदवारांच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल:

  1. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या पहिल्या चार दिवसात
  2. पुढील 5  ते 8  दिवसांच्या दरम्यान.
  3. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या ९ व्या दिवसापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (मतदानाच्या तारखेच्या अगोदरचा दुसरा दिवस)

(उदाहरणार्थ : जर अर्ज मागे  घेण्याची अंतिम तारीख महिन्याच्या 10 तारखेला असेल आणि मतदान महिन्याच्या 24 तारखेला असेल, तर  महिन्याच्या 11 ते 14 तारखेच्या दरम्यान पहिल्यांदा गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीचे निवेदन जाहीर केले जाईल , दुसरे आणि तिसरे निवेदन अनुक्रमे  त्या महिन्याच्या अनुक्रमे 15 आणि 18 तारखेच्या दरम्यान आणि 19  आणि 22 तारखेच्या दरम्यान असेल.)

 


* * *

S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864818) Visitor Counter : 552