जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गांधी जयंती आणि स्वच्छ भारत दिनाच्या निमित्त, स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाच्या वतीने दिल्लीतील आयटीओ छठ घाट येथे स्वच्छता मोहीम

Posted On: 02 OCT 2022 6:23PM by PIB Mumbai

 

गांधी जयंती आणि स्वच्छ भारत दिनाच्या निमित्त, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे (एनएमसीजी) महासंचालक जी. अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील  आयटीओ छठ  घाट येथे स्वच्छता मोहीम आज राबवण्यात आली. भागीदार असलेल्या स्वयंसेवी संस्था एनजीओज, डीजेबी, एमसीडी, विद्यार्थी. गंगा विचार मंच, स्वयंसेवकांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेदरम्यान, छठ घाट येथील संपूर्ण  पट्टा स्वच्छ करण्यात आला. मोहीम सकाळी 7-30 वाजता सुरू झाली. ज्या स्वयंसेवी संस्थांनी या मोहीमेत सहभाग घेतला त्यामध्‍ये  एसवायए, वाय एस एस, ट्री क्रेझ फाऊंडेशन, भारतीयम, एफओवाय, आरवायएफ, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड, यूबीएसएस आदींचा समावेश होता. गांधी जयंती दिनी दरवर्षी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येतो.

नमामि गंगा कार्यक्रमांतर्गत, फेब्रुवारी 2022 पासून दिल्लीतील यमुनेच्या तीरांवर नियमित स्वच्छता मोहिमा प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आणि महिन्यातील एका महत्वाच्या दिवशी स्वयंसेवी संस्था आणि इतर भागधारकांच्या सहाय्याने राबवण्यात येतात.

 

एनएमसीजीचे महासंचालक अशोक कुमार यांनी माहिती दिली की, गंगेच्या तीरांवर गंगेची आरती मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा अर्थगंगा हा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. स्वच्छता दिनी, दिल्लीतील सूर घाट येथे संस्कार भारतीच्या सहाय्याने जय श्री यमुना आरती हा उपक्रमही एनएमसीजीतर्फे आयोजित करण्यात आला होता. गंगेच्या उपनद्या विशेषतः यमुना नदीचा कायापालट घडवण्याचा प्रमुख उद्देष्य नमामि गंगे प्रकल्पाचा आहे.

***

S.Bedekar/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864527) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu