रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेची सप्टेंबर महिन्यात 115.80 मेट्रिक टन मालवाहतुकीची विक्रमी कामगिरी


एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एकत्रित मालवाहतुकीत 736.68 मेट्रिक टनांपर्यंत वाढ, गेल्या वर्षी याच कालावधीतील मालवाहतुकीपेक्षा 10.14 टक्के वाढीची नोंद

Posted On: 02 OCT 2022 2:10PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2022 महिन्यात मालवाहतुकीत 115.80 मेट्रिक टन इतकी विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबर महिन्यातील वाढीव मालवाहतूक 9.7 मेट्रिक टन असून  गेल्या वर्षीच्या 2021 च्या सप्टेंबर महिन्यातील आकड्यापेक्षा ही वाढ 9.15 टक्के इतकी आहे. यासह, भारतीय रेल्वेने सलग पंचवीसाव्यांदा सर्वाधिक मासिक मालवाहतुकीची नोंद केली आहे.

रेल्वेने कोळशाच्या वाहतुकीत 6.8 मेट्रिक टनांची नोंद केली असून त्याखालोखाल 1.2 मेट्रिक टन लोह खनिज, 1.22  मेट्रिक टन शिल्लक इतर माल, 0.4 मेट्रिक टन सिमेंट आणि पक्की भाजलेल्या विटा तसेच  0.3 मेट्रिक टन खते यांचा क्रमांक लागतो. वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये स्वयंचलित वाहनांच्या वाहतुकीत झालेली वाढ हे रेल्वेच्या मालवाहतुकीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य असून वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये सप्टेंबर 2022 पर्यंत 2712 वाघिणींमधून वाहतूक करण्यात आली. या तुलनेत, गेल्या वर्षी, याच कालावधीत 1575 वाघिणींतून वाहतूक करण्यात आली होती.

1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत एकत्रित मालवाहतूक 736.68  मेट्रिक टन इतकी झाली असून 2021-22 मध्ये 668.86 मेट्रिक टन इतकी मालवाहतूक झाली होती. म्हणजे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा वाढीव मालवाहतूक 67.83 मेट्रिक टन इतकी असून ही वाढ टक्केवारीत सांगायचे तर 10.14 टक्के इतकी आहे. मालवाहतुकीचे एनकेटीएमएसमध्ये  (किलोमीटरमागे निव्वळ टन) सप्टेंबर  2021मध्ये 63.43 अब्ज  मालवाहतुकीपेक्षा सप्टेंबर  2022 मध्ये 69.97 अब्ज इतकी वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ 10.3 टक्के इतकी आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 17.1 टक्के इतकी एनटीकेएम वाढ झाली आहे.

उर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या निकटच्या सहकार्यातून कोळशाचा वीज निर्मिती केंद्रांना शाश्वत पुरवठा करण्याच्या भारतीय रेल्वेचे प्रयत्न हे सप्टेंबर महिन्यात रेल्वेच्या मालवाहतुकीचे पुन्हाही प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळशाची वाहतूक (देशांतर्गत आणि आयातित दोन्ही) सप्टेंबरमध्ये 6.2 मेट्रिक टनांनी वाढली असून 42.00 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे तर गेल्या वर्षी  35.8 मेट्रिक टन कोळसा वाहून नेला होता. म्हणजे ही वाढ 17.3 टक्के इतकी झाली आहे.एकत्रितपणे, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय रेल्वेने वीज निर्मिती केंद्रांना 64.53 मेट्रिक टन इतका जादा कोळशाचा पुरवठा केला असून गेल्यावर्षी याच कालावधीतील वाहतुकीपेक्षा ही वाढ 29.3 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

मालनिहाय वाढीचे आकडे असे दर्शवतात की भारतीय रेल्वेने सर्व मालाच्या वाहतुकीत प्रभावी अशी कामगिरी नोंदवली आहे. मालानुसार खालीलप्रमाणे वाढीचे दर दिले आहेत.

Commodity

Variation (MT)

% variation

Coal

6.8

14

Cement and Clinker

0.4

3.4

POL

0.29

8.19

Fertilizer

0.33

7.9

Containers ( Domestic)

0.09

6.15

Balance Other Goods

1.2

14.1

Iron ore

1.2

10.8

 

***

S.Pophale/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864417) Visitor Counter : 175


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil