आयुष मंत्रालय

"आयुर्वेद दिवस 2022" उत्सवाचा भाग म्हणून आयुष मंत्रालयाने  शॉर्ट व्हिडिओ मेकिंग स्पर्धा केली जाहीर


MyGov.in च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा 18 वर्षांवरील सर्व नागरिक/भारताचे राष्ट्रीयत्व असलेल्यांसाठी खुली आहे.

Posted On: 01 OCT 2022 7:23PM by PIB Mumbai

 

आयुर्वेद दिवस 2022 च्या उत्सवाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या  आयुष मंत्रालयाने  MyGov.in च्या सहकार्याने  शॉर्ट व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आयोजित केली आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी या वर्षीच्या आयुर्वेद दिवसाच्या  मुख्य संकल्पनेवर आधारित म्हणजेच हर दिन हर घर आयुर्वेद शी सुसंगत असलेला 03 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी नसलेला  व्हिडिओ हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून पाठवायचा  आहे.

संकल्पना 1: माझा दिवस आणि  आयुर्वेद.

संकल्पना 2: माझ्या स्वयंपाकघरातील आयुर्वेद.

संकल्पना 3: माझ्या बागेतील आयुर्वेद.

संकल्पना 4: माझ्या शेतातील आयुर्वेद.

संकल्पना 5: माझ्या अन्न/आहारातील आयुर्वेद.

प्रत्येक संकल्पनेमधून तीन अव्वल विजेते निवडले जातील म्हणजेच एकूण 15 विजेत्यांना  75,000/- रुपयांपासून पासून ते  25,000/- रुपयांपर्यंतचे पुरस्कार दिले जातील. ही स्पर्धा 18 वर्षांवरील सर्व नागरिक/भारताचे राष्ट्रीयत्व असलेल्यांसाठी   खुली आहे.  व्हिडिओ पाठवण्याची  अंतिम तारीख 10

ऑक्टोबर 2022 आहे. स्पर्धा आणि व्हिडिओ जमा करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक तपशील खालील संकेतस्थळावर पाहता येईल.

https://innovateindia.mygov.in/ayurveda-video-contest/

आयुर्वेद ही औषध पद्धती सर्वात प्राचीन आणि उत्तम दस्तऐवजीकरण झालेली प्रणाली म्हणून ओळखली जाते, जी आधुनिक काळातही तितकीच सुसंगत आहे. आयुर्वेदाचे लाभ सर्वांपर्यंत  पोहोचवण्यासाठी आयुष मंत्रालय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांची मंत्रालये आणि विभागाच्या सहकार्याने  विविध कार्यक्रम आयोजित करत आहे.

आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) या संस्थेच्या सहकार्याने विविध संकल्पना आणि प्रमुख कार्यक्रमांवर आधारित सहा आठवड्यांच्या (12 सप्टेंबर-23 ऑक्टोबर) कार्यक्रमाचे उद्घाटन केले.   या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल संस्था म्हणून या संस्थेची निवड केली आहे.  तीन जे (3Js) म्हणजेच -जन संदेश, जन भागिदारी आणि जन आंदोलन या उद्देशासह  कार्यक्रमात विविध भागधारक सहभागी होतील. आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी ) निमित्त आयुर्वेद दिवस साजरा करत आहे. यावर्षी तो 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाईल.

***

S.Kakade/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864196) Visitor Counter : 203


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu , Hindi