वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मला (युलिप) मिळाला प्रचंड प्रतिसाद; 13 संस्थांनी युएलआयपी वर डेटा  हाताळण्यासाठी गोपनीयता करारावर (एनडीए) केली स्वाक्षरी


कार्यक्षमतेत सुधारणा करून, लॉजिस्टिक प्रक्रिया सुलभ करून, पारदर्शकता आणून आणि लॉजिस्टिकचा खर्च आणि वेळेची बचत करून युलिप  लॉजिस्टिक क्षेत्रात आणणार व्यवसाय सुलभता

Posted On: 01 OCT 2022 6:16PM by PIB Mumbai

 

युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (युलिप-ULIP) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा (NLP)’ भाग म्हणून सुरु केलेला, लॉजिस्टिक क्षेत्रातील एक आशादायक उपक्रम आहे, ज्याचे उद्दिष्ट लॉजिस्टिक प्रक्रिया सुलभ करून, कार्यक्षमतेत सुधारणा करून, पारदर्शकता आणि दृश्यात्मकता आणून आणि लॉजिस्टिकचा खर्च आणि वेळेची बचत करून लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय सुलभता आणणे हे आहे.

या मंचाला  उद्योग क्षेत्राकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. युएलआयपी वर डेटा  हाताळण्यासाठी आतापर्यंत 13 संस्थानी गोपनीयता करारावर (एनडीए) स्वाक्षरी केली आहे, तर आणखी 11 संस्थांबरोबर एनडीएची प्रक्रिया सुरु आहे. या क्षेत्रासाठी नवीन उपाय निर्माण करण्यासाठी स्टार्टअप्स सिध्द झाले आहेत, तर जटिल लॉजिस्टिक प्रक्रिया सुलभ करणे, विक्रेत्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करणे तसेच मालवाहतुकीची दृश्यमानता प्राप्त करणे यासाठी मोठमोठे उद्योग युलिपबरोबर जोडले जाण्यासाठी  विचार करत आहेत.

युलिप मंचामुळे उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना विविध मंत्रालयांकडे उपलब्ध असलेली लॉजिस्टिक्स आणि संसाधनांशी संबंधित माहिती सुरक्षितपणे मिळवता येईल. सध्या सात मंत्रालयांमधील 30 प्रणाली 100 हून अधिक एपीआय(अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) द्वारे जोडण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये भागधारकांद्वारे वापरण्यासाठी 1600 पेक्षा जास्त डेटा फील्ड समाविष्ट आहेत.  युलिपसाठी एक स्वतंत्र पोर्टल आहे, जे डेटा विनंतीची प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक करते. पोर्टलवर पुढील लिंक द्वारे प्रवेश करता येतो https://goulip.in/ .

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864167) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu