उपराष्ट्रपती कार्यालय

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 OCT 2022 3:12PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

''आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, मी अभिवादन करतो आणि  मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक, महात्मा गांधी यांचे विचार आजही  संकटकाळात संपूर्ण मानवजातीसाठी  नैतिकचे प्रतीक आणि आशेचे किरण आहेत. त्यांचा सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्धच्या अहिंसक लढ्याने  जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. गांधीजींचा सत्यावर आणि मानवाच्या अंगभूत चांगुलपणावर असलेला अढळ विश्वास याची आज नितांत गरज आहे.

प्रत्येक पिढीने आपापल्या पद्धतीने महात्मा गांधींचा अभ्यास केला  पाहिजे.  आज जगासमोर असलेल्या गरिबी, हवामान बदल, युद्धासारख्या  अनेक धोक्यांवर गांधीजींनी सांगितलेल्या तत्त्वांचा योग्य वापर करून यशस्वीपणे सामना केला जाऊ शकतो. आजच्या संघर्षमय जगात, युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही ही बापूंची शिकवण मानवतेला मार्गदर्शन करत आहे.

गांधी जयंतीचे औचित्य साधूनहिंसा, अतिरेक, दहशतवाद आणि सर्व प्रकारच्या भेदभावांपासून मुक्त शांततामय जगासाठी प्रार्थना करूया.

***

S.Kakade/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864102) Visitor Counter : 155