आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.68 कोटी मात्रांची संख्या ओलांडली


12 ते 14 वयोगटातील 4.10 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 38,293

गेल्या 24 तासात 3,805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.73%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.39%

Posted On: 01 OCT 2022 2:02PM by PIB Mumbai


 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.68 (2,18,68,45,847) कोटी मात्रांची संख्या ओलांडली आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,30,931) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वाढवणारी वर्धित लसमात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,15,204

2nd Dose

1,01,18,887

Precaution Dose

70,28,132

FLWs

1st Dose

1,84,36,829

2nd Dose

1,77,16,548

Precaution Dose

1,36,59,353

Age Group 12-14 years

1st Dose

4,10,30,931

2nd Dose

3,17,93,640

Age Group 15-18 years

1st Dose

6,19,46,334

2nd Dose

5,30,78,937

Age Group 18-44 years

1st Dose

56,12,83,472

2nd Dose

51,58,13,517

Precaution Dose

9,62,02,389

Age Group 45-59 years

1st Dose

20,40,31,332

2nd Dose

19,69,72,934

Precaution Dose

4,90,06,717

Over 60 years

1st Dose

12,76,70,033

2nd Dose

12,31,46,337

Precaution Dose

4,74,94,321

Precaution Dose

21,33,90,912

Total

2,18,68,45,847

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 38,293 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.9% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.73%. झाला आहे.

गेल्या 24 तासांत 5,069 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,24,164 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,95,416 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.53 (89,53,49,919) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.39 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.29 टक्के इतका आहे.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864092) Visitor Counter : 144