ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना टप्पा सात, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि इतर योजनांच्या आवश्यकता पूर्तीसाठी भारतीय अन्न महामंडळाकडे पुरेसा अन्नधान्य साठा: केंद्र सरकार


भारतीय अन्न महामंडळाकडे 01.04.2023 रोजी राखीव साठा मानकांपेक्षा अधिक अन्नधान्याचा साठा असेल

Posted On: 30 SEP 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

 

भारतीय अन्न महामंडळाकडे  (एफसीआय ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व  इतर योजनांसाठीची गरज पूर्ण करण्यासाठी  आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची  अतिरिक्त गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे. आजपर्यंतच्या नोंदीनुसार महामंडळाकडे  केंद्रीय साठ्यात  अंदाजे 232 एलएमटी (लाख मेट्रिक टन ) गहू आणि 209 एलएमटी  तांदूळ आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, इतर कल्याणकारी योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  टप्पा सात  अंतर्गत साठ्याची आवश्यकता पूर्ण केल्यानंतरही, 1 एप्रिल 2023 रोजी , महामंडळाकडे राखीव साठा नियमांपेक्षा अधिक साठा सहज असेल.   राखीव साठा मानक 75 एलएमटी  गहू आणि 136 एलएमटी  तांदूळ असे असून 1 एप्रिल 2023 रोजी,  सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर, केंद्रीय साठ्यामध्ये सुमारे  113 एलएमटी  गहू आणि 236 एलएमटी  तांदूळ उपलब्ध असतील,असा अंदाज आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अतिरिक्त गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ  पूर्णपणे सज्ज आहे आणि देशाच्या सर्व भागात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी अधिशेष प्रदेशापासून तुटवडा भासत असलेल्या  प्रदेशापर्यंत साठा तत्परतेने पोहोचवला जाईल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  टप्पा VII अंतर्गत (ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022) एकूण 119.62 एलएमटी अन्नधान्य (21.01 एलएमटी  गहू आणि 98.61 एलएमटी  तांदूळ) आणि  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत  79.75 कोटी लाभार्थ्यांना मोफत वितरीत केले जाणार आहे.

माननीय पंतप्रधानांनी 2021 मध्ये केलेल्या लोकाभिमुख घोषणा  आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षेची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना टप्पा सातची  मुदत भारत सरकारने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत आणखी 3 महिन्यांसाठी वाढवली आहे.


* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863907) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi