राष्ट्रपती कार्यालय
भारतीय संरक्षण संपत्ती सेवा विभाग, भारतीय कौशल्य विकास सेवा, भारतीय व्यापार सेवा, भारतीय दूरसंवाद सेवा विभागांच्या अधिकारी/अधिकारी प्रशिक्षणार्थीनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
30 SEP 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
भारतीय संरक्षण संपत्ती सेवा विभाग, भारतीय कौशल्य विकास सेवा, भारतीय व्यापार सेवा, भारतीय दूरसंवाद सेवा विभागांच्या अधिकारी/अधिकारी प्रशिक्षणार्थीनी घेतली ( 30 सप्टेंबर , 2022) राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संबंधित विभागांचा एक भाग झाल्यानंतर देश आणि देशाच्या नागरिकांची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करणे हे तुमचे प्राथमिक उद्दिष्ट असायला हवे, असे राष्ट्रपती यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या. एक लोकसेवक म्हणून त्यांच्या प्रवासात अनेक बदल घडवण्याची संधी मिळेल. असे बदल जे लोकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. या युवा अधिकाऱ्यांनी जनसेवेचे व्रत घेतले तर त्यांना त्यांच्या नोकरीतून मोठे समाधान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण संपत्ती महासंचालनालय, संरक्षण संपत्तीच्या व्यवस्थापनाकरता उपग्रह प्रतिमा, भौगोलिक तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञाचा अवलंब करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. सैनिकी छावण्यांच्या उत्तम व्यवस्थापनाच्या दृष्टीने भारतीय संरक्षण संपत्ती सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. भारतीय दूरसंवाद सेवा विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी तंत्रज्ञान हे अधिक केंद्रस्थानी आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दशकांत भारतात दूरसंचार क्रांती झाली आहे
भारतीय कौशल्य विकास सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपतींनी सांगितले की भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय बहुलतेचा लाभ घेण्यासाठी आपले मनुष्यबळ योग्य प्रकारे कुशल असणे आवश्यक आहे. सध्या कार्यरत असलेल्या लोकसंख्येची उत्पादकता वाढून राष्ट्राच्या विकासात हातभार लागावा यादृष्टीने आपल्या नागरिकांना कौशल्य प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे.
भारताच्या विकासाची यशोगाथा अतिशय आश्वासक आहे, असे राष्ट्रपतींनी भारतीय व्यापार सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे आमचे ध्येय असल्याने आम्ही तुमच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अपेक्षा करतो.
Please click here to see the President's Speech -
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863777)
Visitor Counter : 127