राष्ट्रपती कार्यालय
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
29 SEP 2022 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या गटाने (2021 तुकडी ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (29 सप्टेंबर 2022) राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.
भारत एका नव्या आत्मविश्वासाने जागतिक क्षितीजावर उदयास येत आहे, अशा वेळी हे अधिकारी परराष्ट्र सेवेतील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करत असल्याने हे अधिक उल्हासदायक ठरणार आहे, असे राष्ट्रपती या अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाल्या. जगही भारताकडे नव्या कौतुकाने पाहत आहे, असे त्या म्हणाल्या.
भारताच्या मजबूत स्थितीसाठी इतर घटकांसह आर्थिक कामगिरी देखील महत्वपूर्ण आहे. जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था अजूनही कोरोना महामारीच्या परिणामांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना, भारत मात्र पुन्हा उभा राहिला आणि आता आगेकूच देखील करत आहे. परिणामी, भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान विकास दर असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. किंबहुना, जागतिक आर्थिक सुधारणा काही प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. असे राष्ट्रपती म्हणाल्या. जागतिक पटलावर भारताला हे स्थान मिळण्याचे दुसरे कारण म्हणजे येथील नीतिमूल्ये असल्याचे त्या म्हणाल्या. जगासोबतचे भारताचे संबंध हे आपल्या जुन्या संस्कृती मूल्यांवर अवलंबून आहेत. भारतीय परराष्ट्र सेवा या अधिकारी प्रशिक्षणार्थींना भारताची अभिमानास्पद सभ्यता, वारसा आणि संस्कृती, विकासाच्या आकांक्षांसह जगासमोर मांडण्याची एक अनोखी संधी देत असल्याचे त्या म्हणाल्या.
जगभरात होत असलेल्या बदलांचा संदर्भ देताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अनेक आघाड्यांवर सुरू असलेले परिवर्तन मोठ्या संधी निर्माण करतात तशी मोठी आव्हाने देखील उभी करतात.
या वेगाने बदलणाऱ्या जगात, अनेक संधी आणि धोक्यांमुळे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या कठीण मार्गावरुन मार्गक्रमण करत भारत आणि जगासाठी सर्वोत्कृष्ट सुनिश्चित करणे हीच या अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कसोटी आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे अधिकारी प्रशिक्षणार्थी देशवासीयांच्या हितासाठी भविष्यातील आव्हानांना शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने उत्तर देतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863359)
Visitor Counter : 250