संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून सरकारकडून नियुक्ती
Posted On:
28 SEP 2022 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) PVSM, UYSM, AVSM, SM, VSM यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, जे त्यांचा पदभार स्वीकारण्याची तारीख आणि पुढील आदेशापर्यंत भारत सरकारच्या, लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अनेक प्रकारच्या नेतृत्वाच्या पदांवर, कर्मचारी आणि सहाय्यक पदांवर काम केले आहे आणि जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतात दहशतवादविरोधी कारवायांचा त्यांना व्यापक अनुभव आहे.
18 मे 1961 रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना 1981 मध्ये भारतीय सैन्याच्या 11 गोरखा रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. मेजर जनरल श्रेणीच्या या अधिकाऱ्याने नॉर्दर्न कमांडमधील अतिशय महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. त्यानंतर लेफ्टनंट जनरल म्हणून, त्यांनी ईशान्येतील एका कोअरचे नेतृत्व केले आणि नंतर सप्टेंबर 2019 पासून ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि मे 2021 मध्ये सेवेतून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
नेतृत्वाच्या या नियुक्त्यांव्यतिरिक्त, अधिकाऱ्याने लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांच्या कार्यभारासह महत्त्वाच्या स्टाफ नियुक्त्यांवर देखील त्यांनी काम केले आहे. यापूर्वी त्यांनी अंगोलामध्ये संयुक्त राष्ट्र मिशन म्हणूनही काम केले होते. 31 मे 2021 रोजी ते भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले. सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये योगदान देणे सुरू ठेवले. लष्करातील त्यांच्या विशेष आणि उल्लेखनीय सेवेबद्दल, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863183)
Visitor Counter : 228