ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
पोषणयुक्त मूल्यवर्धित तांदूळ लोकप्रिय करण्यासाठी आयईसी ने महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील आदिवासी भागात राबवली मोहीम
‘पोषणमूल्यवर्धित तांदळाद्वारे पोषणसुरक्षा’ यावर तज्ञांनी टाकला प्रकाश
Posted On:
27 SEP 2022 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022
देशात, विशेषतः देशाच्या आदिवासी भागात पोषणमूल्यवर्धित तांदूळ लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याच्या फायद्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (डीएफपीडी) तसेच गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, तेलंगणा, राजस्थान, केरळ या राज्यांच्या सरकारांनी थॅलेसेमिया आणि सिकलसेल ॲनिमिया या आजारांचे प्रमाण अधिक असलेले आदिवासी भाग आणि जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली होती.

गुजरातमध्ये राज्य सरकारने सप्टेंबर 9, 2022 रोजी मेरील अकादमी येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यानंतर, डीएफपीडी, विकास भागीदार आणि एफसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार आणि नाशिक यासह विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या, या कार्यक्रमांना राज्य सरकारचे मंत्री, जिल्हाधिकारी, डीएम, तांत्रिक तज्ञ, स्थानिक तज्ञ, स्थानिक तज्ञ, डॉक्टर्स, नागरी शल्यविशारद, एनजीओ, वाजवी किंमत दुकानदार, सरपंच, आदिवासी भागातील कर्ज पुरवठादार, नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, आरोग्य, आयसीडीएस, विकास भागीदार आणि तद्न्य उपस्थित होते.
सादरीकरणानंतर डी/ओ अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि एफसीआयचे तांत्रिक तज्ञ आणि अधिकाऱ्यांनी आयोजित केलेली पॅनेल चर्चा आणि प्रश्नोत्तर सत्रे झाली.

तज्ञांनी लोकांसाठी पोषणमूल्य वर्धित तांदळाचे असलेले फायदे अधोरेखित केले, याबाबत लोकांच्या आणि स्थानिक माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले आणि त्यांच्या गैरसमजांचे निराकरण केले.
तांदळाचे पोषणमूल्य वाढवणे हे कमी कालावधीत (TAT) आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण वाढवण्यासाठी एक किफायतशीर आणि पूरक धोरण असल्याचे आढळून आले आहे. तसेच हे पोषण देशाच्या आरोग्य सुरक्षेच्या दिशेने पुढचे पाऊल असून देशातील अॅनिमिया आणि कुपोषणाच्या समस्येशी लढायला यामुळे मोठी मदत मिळेल. हे धोरण जगात अनेक ठिकाणी लागू करण्यात आले आहे.
R.Aghor /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862712)
अभ्यागत कक्ष : 219