उपराष्ट्रपती कार्यालय

जागतिक पर्यटन स्थळांना भेट देण्यापूर्वी देशातील पर्यटन स्थळांना भेट द्या; उपराष्ट्रपतींचे भारतीय पर्यटकांना आवाहन


भारत हा पर्यटनासाठी स्वर्ग असल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

2018-19 च्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

महाराष्ट्राची पुरस्कारात बाजी, तब्बल नऊ राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

Posted On: 27 SEP 2022 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज भारताचे वर्णन पर्यटनासाठीचा स्वर्ग असे केले असून भारतीयांनी जगतीक पर्यटन  स्थळांना भेट देण्यापूर्वी देशातील पर्यटन स्थळांना भेट द्यावी असे आवाहन केले. भारताचा प्रदीर्घ सांस्कृतिक इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा संदर्भ देत, त्यांनी अधोरेखित केले की देशातील बहुतेक पर्यटन स्थळांचा आपला इतिहास, लोककला आणि प्राचीन ग्रंथ यांच्याशी खोलवर संबंध आहे.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज 2018-19 वर्षासाठीचे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केल्यावर उपस्थितांना संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी पर्यटन हा देशाचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीचा प्रमुख चालक असल्याचे नमूद केले.

पर्यटनाच्या विविध पैलूंचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी वैद्यकीय पर्यटन तसेच आयुर्वेद आणि योग यासारख्या भारताच्या प्राचीन उपचार पद्धतींमधील वाढती जागतिक रुची या क्षेत्रात भारताच्या अफाट क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्याच्या गरजेवर भर दिला.

देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना धनखड म्हणाले की पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासाला देखो अपना देश आणि उत्सव पोर्टल या नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड मिळाली.              

प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यामधील राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे महत्व लक्षात घेऊन, उपराष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्यांचे कठोर परिश्रम आणि उत्कृष्टतेबद्दल अभिनंदन केले.

यंदा महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष  पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. त्याशिवाय महाराष्ट्रातील आठ संस्थांनाही विविध श्रेणीतले पुरस्कार मिळाले आहेत.

आझादी का अमृत महोत्सव हा आयकाॅनिक साप्ताह साजरा केल्याबद्दल त्यांनी पर्यटन मंत्रालयाचे अभिनंदन देखील केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी ‘इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स 2022’ चे प्रकाशन केले आणि GoBeyond:75 Experiences of North India या ई-बुकचे प्रकाशन केले.

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, पर्यटन आणि सांस्कृतिक राज्य मंत्री अजय भट्ट, पर्यटन मंत्रालयाचे सचीव अरविंद सिंग, पर्यटन मंत्रालायाचे अतिरिक्त सचीव राकेश कुमार वर्मा, पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक जी. कमला वर्धन राव, आणि अन्य मान्यवर या पुरस्कार समारंभाला उपस्थित होते. 

पुरस्कारप्राप्त विजेत्यांची सविस्तर यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय पर्यटन सांख्यिकी 2022 बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

  

 

 

 

 

R.Aghor /R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862699) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil