संरक्षण मंत्रालय
अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस) क्षेपणास्त्राची डीआरडीओने घेतलेल्या उड्डाण चाचण्या यशस्वी
Posted On:
27 SEP 2022 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 27 सप्टेंबर 2022 रोजी,ओदीशाच्या किनार्याजवळील चांदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रात जमिनीवर आधारित सुवाह्य प्रक्षेपकाद्वारे अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस ) क्षेपणास्त्राच्या, घेतलेल्या दोन्ही उड्डाण चाचण्या यशस्वी झाल्या. व्हीएसएचओआरएडीएस ही एक, हैदराबाद इतर डीआरडीएओ प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने, डीआरडीओच्या संशोधन इमरत (आरसीआय ) द्वारे डिझाइन आणि विकसित केलेली एक मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम (मॅनपॅड ) स्वदेशी प्रणाली आहे.
व्हीएसएचओआरएडीएस क्षेपणास्त्रामध्ये सूक्ष्म अभिक्रिया नियंत्रण प्रणाली (आरसीएस ) आणि एकात्मिक विमानशास्त्रासह अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असून हे चाचण्यांदरम्यान यशस्वीरित्या सिद्ध झाले आहे.हे क्षेपणास्त्र, कमी उंचीवरील हवाई धोक्यांना कमी पल्ल्यावर नष्ट करण्यासाठी ड्युअल थ्रस्ट सॉलिड मोटरद्वारे प्रक्षेपित केले जाते. सुलभ सुवाह्यता सुनिश्चित करण्यासाठी, प्रक्षेपकासह क्षेपणास्त्राची रचना अत्यंत अनुकूल करण्यात आली आहे. दोन्ही उड्डाण चाचण्यांनी मोहिमेची उद्दिष्टे संपूर्णपणे पूर्ण केली आहेत.
माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि उद्योग भागीदारांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांचे कौतुक केले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नवीन क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना आणखी तंत्रज्ञानात्मक चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अभूतपूर्व यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओच्या अध्यक्षांनी या चाचणीत सहभाई संपूर्ण व्हीएसएचओआरएडीएस चमूचे अभिनंदन केले आहे .
R.Aghor /S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862687)
Visitor Counter : 295