दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
व्यापक डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल मंचांचा विकास आणि सर्वांना डिजिटल सेवा उपलब्ध होतील हे सुनिश्चित करणे यावरच उत्तम डिजिटल भविष्याची उभारणी - देवूसिंह चौहान
Posted On:
25 SEP 2022 9:22PM by PIB Mumbai
व्यापक प्रमाणात डिजिटल पायाभूत सुविधा, प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारी सेवा पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे आणि सर्वांना डिजिटल सेवांचा लाभ मिळेल,हे सुनिश्चित करणे यावरच उत्तम डिजिटल भविष्याची उभारणी होऊ शकते,असे केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते आज रोमानियामधल्या बुखारेस्ट,येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या पूर्णाधिकार परीषदेचा भाग असलेल्या मंत्रिस्तरीय गोलमेज बैठकीला संबोधित करत होते.'डिजिटल क्षेत्राच्या उज्वल भविष्याची उभारणी ' ( बिल्डिंग बेटर डिजिटल फ्युचर) ही परिषदेची संकल्पना आहे.

उत्तम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या एकात्मिक दृष्टिकोनाचे महत्त्व देवुसिंह चौहान यांनी अधोरेखित केले. 1.5 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करणारा 5G स्पेक्ट्रमचा अलीकडेच झालेला यशस्वी लिलाव, उद्योग क्षेत्राकडून येणारा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद दर्शवित आहे,असे त्यांनी यावेळी नमूद केले. नागरिक केंद्रित आणि उद्योगस्नेही सार्वजनिक धोरणांचा हा परिणाम आहे तसेच भारताच्या भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन देखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाच्या यशावर देवुसिंह चौहान यांनी प्रकाश टाकला. त्यांनी आधार आणि आधार सक्षम वेतन यंत्रणेच्या (AEPS) यशाचा पुनरुच्चार यावेळी केला.

***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862155)
Visitor Counter : 277