युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2020-21 साठी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार केले प्रदान
Posted On:
24 SEP 2022 6:10PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात 2020-2021 साठीचे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. युवा कार्य सचिव संजय कुमार आणि क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती होती.
विद्यापीठे/+2 परिषद, कार्यक्रम अधिकारी/ राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांनी समुदाय सेवेसाठी केलेले उल्लेखनीय योगदान ओळखून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, युवा व्यवहार विभाग, दरवर्षी त्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करते. सध्या देशभरात एनएसएसचे सुमारे 40 लाख स्वयंसेवक आहेत. 2020-21 या वर्षासाठी 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पुरस्काराचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
S. No.
|
Categories
|
No. of Awards
|
Value of Award
|
1
|
University/ +2 Council
|
2
|
First Award: Rs.5,00,000/- (for NSS Programme Development) with a Trophy to the University/ +2 Council.
A Certificate and a Silver Medal to the Programme Coordinator.
Second Award: Rs.3,00,000 lakh (for NSS Programme Development) with a Trophy to the University/ +2 Council.
A Certificate and a Silver Medal to the Programme Coordinator.
|
2
|
NSS Units and their Programme Officers
|
10+10
|
Rs.2,00,000/- to each NSS Unit (For NSS Programme Development), with a Trophy.
Rs. 1,50,000/- to each Programme Officer with a Certificate and a Silver Medal.
|
3
|
NSS Volunteers
|
30
|
Rs. 1,00,000/- to each Volunteer, with a Certificate and a Silver Medal.
|
एनएसएस ही 1969 मध्ये सुरू झालेली केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चरित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरू झाली होती. एनएसएसची वैचारिक दिशा ही महात्मा गांधीजींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. ‘आपल्याआधी दुसरा’ , (‘स्वयं से पहले आप’) असे एनएसएसचे अतिशय समर्पक ब्रीदवाक्य आहे.
नियमित आणि विशेष कॅम्पिंग उपक्रमांद्वारे समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे काम चालते (i) साक्षरता आणि शिक्षण, (ii) आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पोषण, (iii) पर्यावरण संवर्धन, (iv) सामाजिक सेवा कार्यक्रम, (v) महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, (vi) आर्थिक विकासाशी संबंधित कार्यक्रम, उपक्रम, (vii) आपत्तीच्या काळात बचाव आणि मदत, (viii) स्वच्छता उपक्रम अशा सामाजिक संदर्भांच्या मुद्द्यांवर एनएसएस स्वयंसेवक काम करतात.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861951)
Visitor Counter : 236