वस्त्रोद्योग मंत्रालय

ग्वाटेमालामध्ये आयोजित मेड इन इंडिया व्यापार मेळा प्रदर्शनात- भारतीय हस्तकला वस्तूंना उल्लेखनीय प्रतिसाद


भारताच्या सर्व भागातील दहा राष्ट्रीय विशेष कौशल्यप्राप्त कारागीर आणि निर्यातदार करत आहेत हस्तकला उत्पादनांच्या विविध प्रकारांचे प्रदर्शन

ग्वाटेमालाच्या( लॅटिन अमेरिका) उपाध्यक्षांनी केले भारतीय कक्षाचे उद्घाटन

Posted On: 24 SEP 2022 12:26PM by PIB Mumbai

 

हस्तकला उत्पादन निर्यात प्रोत्साहन परिषदेने ग्वाटेमालामधील भारतीय मिशनच्या सहकार्याने ग्वाटेमालामधील ग्वाटेमाला सिटीमध्ये भारतीय कला आणि कलाकुसरीच्या वस्तू आणि इतर उत्पादनांवर आधारित भारतीय हस्तकला उत्पादक आणि निर्यातदारांच्या मेड इन इंडिया व्यापारी मेळा प्रदर्शनाचे 22 ते 24 सप्टेंबर 2022 दरम्यान आयोजन केले आहे. या प्रदर्शनात भारताच्या  सर्व भागातून आलेले 10 विशेष प्रावीण्यप्राप्त राष्ट्रीय कारागीर घरगुती सजावटीच्या वस्तू, होम फर्निशिंग, गालिचे, फर्निचर, दिवे, फॅशन ज्वेलरी आणि सामग्री, सुगंधी उत्पादने यांसारख्या हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन करत आहेत.

ईपीसीएचचे कार्यकारी संचालक राकेश कुमार, ग्वाटेमालाचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष गुलिर्मो कॅस्टिलो आणि ग्वाटेमालामधील भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी ग्वाटेमालामध्ये मेड इन इंडिया व्यापार मेळ्याचे उद्घाटन केले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी त्यांनी ईपीसीएचला संपूर्ण सहकार्य देऊ केले आहे आणि हस्तकला उद्योगाला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या निर्यातदार समुदायाच्या अदम्य भावनेचे दर्शन घडवले आहे.

भारतीय कला आणि कलाकुसरीच्या वस्तूंचा हा मेड इन इंडिया- व्यापार मेळा येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांना आणि खरेदीदारांना एक व्यवहार्य व्यापार पर्याय उपलब्ध करून देईल, असे ईपीसीएच चे अध्यक्ष राज कुमार मल्होत्रा यांनी सांगितले. मेड इन इंडिया- व्यापार प्रदर्शन मेळा लॅटिन अमेरिका प्रदेशात भारतीय उत्पादनांच्या व्यापाराला आणि लोकांशी लोकांच्या संपर्काला चालना देईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

जगाला प्रशंसनीय असलेल्या भारताच्या विविधतेचे दर्शन घडवण्याची संधी मेड इन इंडिया- व्यापार मेळा देत आहे, असे भारताचे ग्वाटेमालामधील राजदूत डॉ. मनोज कुमार मोहपात्रा यांनी सांगितले. भारताकडे विपुल प्रमाणात असलेले कौशल्य, स्पर्धात्मकता आणि जगाला अपेक्षित असणारी, दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडवण्याची देखील ही संधी असेल.

ईपीसीएच ही हस्तकलेच्या वस्तूंची भारतातून जगात विविध ठिकाणी निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देणारी नोडल संस्था आहे आणि उच्च दर्जाच्या हस्तनिर्मित वस्तू आणि सेवा यांचा विश्वासार्ह पुरवठादार अशी भारताची प्रतिमा निर्माण करत आहे. 2021-22 मध्ये हस्तकला उत्पादनांची निर्यात 33,253 कोटी रुपये झाली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुपयांच्या प्रमाणात 29.49 टक्के आणि डॉलरच्या प्रमाणात 28.90 टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, 2021-22 मध्ये हस्तकला उत्पादनांची लॅटिन अमेरिकेला 682 कोटी रुपयांची निर्यात झाली.

 

Mr.Guillermo Castillo, Vice President of Guatemala & acting President and H.E. Ambassador of India to Guatemala Dr. Manoj Kumar Mohapatra along with other dignitaries inaugurating Made in India - Trade Show Exhibition on Indian arts & crafts at Cayala, Guatemala City, Guatemala

 

Mr.Guillermo Castillo, Vice President of Guatemala & acting President and H.E. Ambassador of India to Guatemala Dr. Manoj Kumar Mohapatra along with participating national awardees and master craft persons during Made in India - Trade Show Exhibition on Indian arts & crafts at Cayala, Guatemala City, Guatemala.

***

M.Jaybhaye/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1861910) Visitor Counter : 224


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu