सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे उद्या 'सांकेतिक खुणांची भाषा दिन' साजरा करण्यात येणार
Posted On:
22 SEP 2022 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील आयएसएलआरटीसी अर्थात भारतीय सांकेतिक खुणांच्या भाषेवरील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे उद्या 23 सप्टेंबर 2022 रोजी, नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय केंद्रातील सी.डी.देशमुख सभागृहात सांकेतिक खुणांची भाषा दिन-2022 साजरा करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्रांनी 23 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक खुणांची भाषा दिन म्हणून जाहीर केला आहे तेव्हापासून आयएसएलआरटीसी दरवर्षी हा दिवस साजरा करत असते. यावर्षी, गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा”चा भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे 23 सप्टेंबर 2022 रोजी “सांकेतिक खुणांची भाषा दिन” साजरा करण्यास मंजुरी दिली. या महत्त्वाच्या उत्सवप्रसंगी, दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग/सीआरसीज/आरसीज/ संबंधित बिगर-सरकारी संस्था/ मुकबधीर दिव्यांगांसाठी असलेली विद्यालये यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व राष्ट्रीय संस्थांमध्ये हा दिन साजरा करण्यासाठी त्या त्या संस्थांमध्ये तसेच त्याबाहेरील क्षेत्रात अधिकाधिक लोकसहभागासह विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित कृती योजनेनुसार, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा”चा भाग म्हणून “सांकेतिक खुणांची भाषा दिन” साजरा करण्यासाठी अंदाजे 3,200 संघटना/ संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला सांकेतिक खुणांच्या भाषेचे महत्त्व समजावून देणे तसेच सदोष श्रवणक्रिया असलेल्या दिव्यांग व्यक्तींना माहिती तसेच संवादाबाबत सुविधा उपलब्ध करून देणे हा मोठ्या प्रमाणात हा दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. सांकेतिक खुणांची भाषा केवळ लोकांना शिक्षित करण्यातच महत्त्वाची भूमिका बजावते असे नाही तर सदोष श्रवणक्रिया असलेल्या व्यक्तींसाठी रोजगार तसेच व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी मदत करण्यात अत्यंत महत्त्वाची ठरते.
“सांकेतिक खुणांची भाषा आपल्याला एकत्र आणते” ही या वर्षीच्या सांकेतिक खुणांची भाषा दिन साजरा करण्यासाठीची संकल्पना आहे. डब्ल्यूएफडी नुसार, या दिवशी आपण सांकेतिक खुणांची भाषा हा सदोष श्रवणक्रिया असलेल्या लोकांचा अत्यावश्यक मानवी हक्क आहे याला पाठींबा दर्शविणाऱ्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करूया आणि मानवी हक्कांसाठी ही स्वाक्षरी करुया! या दिवशी, श्रवणदोषाशी संबंधित समुदाय, सरकारे आणि नागरी समाज प्रतिनिधी या सर्वांना जगभरातील विविध राष्ट्रीय सांकेतिक खुणांच्या भाषांची ओळख करुन देऊन त्याविषयी प्रोत्साहित करणे यासाठी एकत्रित प्रयत्न केले जातात.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री प्रतिमा भौमिक तर सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी उपस्थित राहणार आहेत.
R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861599)
Visitor Counter : 219