भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

बीटीएस इन्वेस्टमेंट 1 पीटीई लिमिटेड आणि रिलायंस प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड द्वारे गुंतवणूक केल्यानंतर, सीसीआयने वायकॉम 18 मिडिया प्रायवेट लिमिटेडसह जियो सिनेमा ओटीटी मंचच्या एकत्रीकरणाला दिली मान्यता

Posted On: 22 SEP 2022 1:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) बीटीएस इन्वेस्टमेंट 1 पीटीई लिमिटेड (BTS1) आणि रिलायंस प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड (RPPMSL) द्वारे गुंतवणूक केल्यानंतर, वायकॉम 18 मिडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18) सह जियो सिनेमा ओटीटी मंचच्या एकत्रीकरणाला मान्यता दिली. 

बीटीएस1 और आरपीपीएमएसएलच्या गुंतवणूकीनंतर, प्रस्तावित संयोजनात वायकॉम 18 सह जियो सिनेमा ओटीटी मंचाच्या एकीकरणाचा समावेश आहे.

बीटीएस 1 (BTS1) सिंगापूर कायद्याअंतर्गत कार्यरत कंपनी आहे. सध्या ही कंपनी निधी उभारणी, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांसह विविध गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारण्याच्या  प्रक्रियेत आहे.

आरपीपीएमएसएल ही, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असून, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यवसाय आणि पायाभूत सुविधा सहाय्य सेवा, मनुष्यबळ सेवा, दूरसंचार सुविधांची उभारणी आणि त्या कार्यान्वित करण्याच्या कार्यात सक्रीय आहे. आरपीपीएमएसएल सध्या जिओ सिनेमा ओटीटी मंच ताब्यात घेण्याच्या आणि कार्यान्वयन प्रक्रीयेत आहे.

आरएसएल सध्या कोणत्याही व्यावसायिक प्रक्रीयेत नाही.

वायकॉम 18 भारतातील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात खालील सेवा प्रदान करते: (अ) सर्व शैलींमध्ये वाहिन्यांचे प्रसारण, (ब) वूट आणि वूट किड्सद्वारे ओटीटी प्रसारण, (क) चित्रपट निर्मिती आणि वितरण, ( ड) डिजिटल सामग्रीची निर्मिती आणि परवाना आणि (ई) इतर संबंधित व्यवसाय.

सीसीआयचा तपशीलवार आदेश लवकरच येईल.

 

S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1861452) Visitor Counter : 184