आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च रक्तदाबाविरोधात एनएचएम अंतर्गत मोठ्या प्रमाणावर राबवलेल्या उपक्रमाबद्दल भारताला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार


प्राथमिक आरोग्यनिगा प्रणालीमध्ये असामान्य कार्य केल्याबद्दल ‘भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण उपक्रमाचा’सन्मान

Posted On: 21 SEP 2022 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

उच्च रक्तदाबाविरोधात देशात सुरु असलेल्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेण्यासारखी असामान्य कामगिरी भारताने केली असून भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण उपक्रम (IHCI), या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उच्च रक्तदाबविषयक व्यापक मोहिमेला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उपक्रमाची प्रशंसा करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले आहे, आयएचसीआयने PM @NarendraModi यांच्या सर्वांसाठी आरोग्य आणि निरामय जीवन या मोहिमेला बळकटी दिली आहे. आम्ही एका निरोगी आणि तंदुरुस्त भारताची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आयसीएमआर, राज्य सरकारे आणि जागतिक आरोग्य  संघटनेची भारतातील शाखा यांचा हा संयुक्त उपक्रम असून या उपक्रमाला ‘ 2022 ‘यूएन इंटरएजन्सी टास्क फोर्स आणि डब्लूएचओ स्पेशल प्रोग्राम ऑन प्रायमरी हेल्थ केअर ऍवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(i) बिगर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध व  नियंत्रण आणि (ii) लोकाभिमुख प्राथमिक काळजीविषयक सेवांचा पुरवठा या क्षेत्रात भारताची असामान्य वचनबद्धता आणि कृती यांना या पुरस्काराने मान्यता दिली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्यनिगा पुरवठा प्रणालीचा सुयोग्य वापर करण्यात आणि तिला बळकटी देण्यात, राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात आणि लोकसंख्या आधारित तपासणी आणि आरोग्य निगा यांमधील दुव्यांमध्ये सुधारणा करण्यात आयएचसीआयला यश मिळाले आहे. 2017 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता आणि टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करत 23 राज्यांमधील 130 जिल्ह्यांमध्ये तो राबवला जात आहे. उच्च रक्तदाबाची समस्या असलेले  34 लाखांपेक्षा जास्त लोक आयुष्मान भारत आरोग्य निरामयता केंद्रांसह सरकारी आरोग्य सुविधांमध्ये उपचार घेत आहेत. आयएचसीआय अंतर्गत उपचार घेतलेल्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आला आहे.   

 

 

S.Kulkarni /S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1861336)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu