गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात नक्षलवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात सुरक्षा दलांनी मिळवला निर्णायक विजय


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नक्षलवादाविरोधातील शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा परिणाम म्हणून,छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर वसलेल्या ‘बुढापहाड’ आणि बिहारच्या चक्रबंधा आणि भीमबांध या अत्यंत दुर्गम भागात प्रथमच प्रवेश करून माओवाद्यांना त्यांच्या गडांमधून यशस्वीपणे हुसकावून लावण्यात आले असून तिथे सुरक्षा दलाच्या कायमस्वरूपी छावण्या उभारण्यात आल्या

हे सर्व भाग जहाल माओवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी केले जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या निर्णायक यशाबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन करत सांगितले की, नक्षलवाद आणि दहशतवादाविरुद्ध गृह मंत्रालयाचे शून्य सहनशीलता धोरण सुरू राहील आणि हा लढा आणखी तीव्र केला जाईल

वर्ष 2022 मध्ये, सुरक्षा दलांना ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबंधामध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे.छत्तीसगडमध्ये 7 माओवादी ठार झाले आणि 436 अटक/आत्मसमर्पण /4 माओवादी झारखंडमध्ये ठार झाले तर 120 अटक/आत्मसमर्पण केले. बिहारमध्ये 36 माओवाद्यांची अटक / आत्मसमर्पण मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 माओवाद्यांना ठार केले आहे

1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या मिथिलेश महतो प्रमाणेच या ठार झालेल्या अनेक माओवाद्यांना शोधून देण्यासाठी काही लाख/ कोटी रुपयांचे इनाम होते या पार्श्वभूमीवर हे यश महत्त्वाचे

2018 च्या तुलनेत 2022 मध्ये, नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांमध्ये 39% घट, नक्षलवाद्यांसोबतच्या लढाईत सुरक्षा दलांनी दिलेल्या बलिदानाच्या संख्येत 26% घट, नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण 44% इतके कमी. हिंसाचार नोंदवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 24% ने घट आणि 2022 मध्ये या जिल्ह्यांची संख्या केवळ 39. ही मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे हे सिद्ध होते

Posted On: 21 SEP 2022 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्षलवाद - मुक्त भारताच्या संकल्पनेला मूर्त रूप देणे आणि नक्षलवाद अजिबात खपवून न घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शून्य सहिष्णुता धोरण याला अनुसरून नक्षलवादविरोधात गृह मंत्रालय निर्णायक लढाईच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नक्षलवादविरोधात सुरू असलेल्या लढ्यात आज सुरक्षा दलांनी निर्णायक विजय मिळवला.

नक्षलवादविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा परिणाम म्हणून, प्रथमच छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर स्थित ' बूढा पहाड़ ' आणि बिहारच्या चक्रबांध आणि भीमबांधच्या अति दुर्गम भागात प्रवेश करून नक्षलवाद्यांना त्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानातून हुसकावून लावण्यात आले आणि तिथे सुरक्षा दलांच्या कायमस्वरूपी छावण्या उभारल्या आहेत. हे संपूर्ण क्षेत्र देशातील  प्रमुख नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी जप्त केले .

नक्षलवाद्यांविरोधात 2019 पासून विशेष रणनीती अवलंबली जात आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आणि संबंधित यंत्रणांचे समन्वित प्रयत्न आणि राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे नक्षलविरोधी लढ्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.

या निर्णायक यशाबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालय नक्षलवाद आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण सुरूच ठेवेल आणि हा लढा अधिक तीव्र केला जाईल.

2022 मध्ये नक्षलवाद्यांविरोधातल्या लढ्यात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबांधमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये 7 नक्षलवादी मारले गेले आणि 436 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. झारखंडमध्ये 4 नक्षलवादी ठार झाले आणि 120 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. बिहारमध्ये 36 नक्षलवाद्यांना अटक झाली / आत्मसमर्पण केले. तसेच मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. 1 कोटी रुपयांचे बक्षीसअसलेल्या मिथिलेश महतो प्रमाणेच   यात ठार झालेल्या अनेक नक्षलवाद्यांवर लक्षावधी-कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते हे यश महत्त्वाचे ठरते कारण.

2014 पूर्वीच्या तुलनेत, नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना 77 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2009 मध्ये 2,258 इतक्या सर्वोच्च हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या. 2021 मध्ये या घटना 509  या संख्येपर्यंत खाली आल्या आहेत. हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ही 85 टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2010 मध्ये, ही मृत्यूची संख्या 1005 अशी सर्वाधिक होती. ती 2021 मध्ये 147 मृत्यु  इतकी कमी झाली. नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाचे क्षेत्रही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. 2010 मध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव  देशभरातील 96 जिल्ह्यांमध्ये होता. 2022 मध्ये त्यांचे केवळ 39 जिल्ह्यांवर त्यांचे वर्चस्व उरले आहे.

नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांच्या कारवायांची तपशीलवार माहिती येथे पहा

 

JPS/Sonal C/Sushama/Prajna/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1861312) Visitor Counter : 111


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia