श्रम आणि रोजगार मंत्रालय
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांच्या खर्चाच्या क्षमतेवर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- ऑगस्ट, 2022
Posted On:
20 SEP 2022 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022
कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक क्रमांक (आधार: 1986-87=100) ऑगस्ट, 2022 साठी प्रत्येकी 9 अंकांनी वाढून अनुक्रमे 1140 (एक हजार एकशे चाळीस) आणि 1152 (एक हजार एकशे बावन्न) झाला आहे.
अन्न गटातून तांदूळ, गव्हाचं पीठ, बाजरी, मका, कडधान्ये, दूध, कांदा, मिरची हिरवी/कोरडी, संपूर्ण हळद, मिश्रित मसाले, भाज्या आणि फळे, गूळ इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सामान्य निर्देशांकात वाढ झाली आहे. शेतमजूर वर्गाच्या खर्चाच्या क्षमतेवर आधारित निर्देशांक 7.74 आणि ग्रामीण मंजुरांच्या खर्चाच्या क्षमतेवर आधारित निर्देशांक 7.36 अंकांपर्यंत आले आहेत. निर्देशांकातील वाढ राज्यानुसार बदलते. शेतमजुरांच्या बाबतीत 20 राज्यांमध्ये निर्देशांकात 3 ते 15 अंकांची वाढ नोंदवली गेली. निर्देशांकात तामिळनाडू 1312 अंकांसह अव्वल तर हिमाचल प्रदेश 898 अंकांसह तळाशी आहे.
Group
|
Agricultural Labourers
|
Rural Labourers
|
|
July, 2022
|
August, 2022
|
July, 2022
|
August, 2022
|
General Index
|
1131
|
1140
|
1143
|
1152
|
Food
|
1058
|
1069
|
1066
|
1077
|
Pan, Supari, etc.
|
1913
|
1919
|
1923
|
1929
|
Fuel & Light
|
1263
|
1267
|
1255
|
1259
|
Clothing, Bedding &Footwear
|
1190
|
1198
|
1226
|
1235
|
Miscellaneous
|
1196
|
1200
|
1201
|
1206
|
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत 20 राज्यांमध्ये 3 ते 17 अंकांची वाढ नोंदवली गेली. 1301 अंकांसह तामिळनाडू अव्वल तर हिमाचल प्रदेश 951 अंकांसह तळाशी आहे.
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांच्या ग्राहक दर निर्देशांकावर आधारित महागाईचा पॉइंट टू पॉइंट दर ऑगस्ट 2022 मध्ये 6.94% आणि 7.26% राहिला. जुलै 2022 मध्ये अनुक्रमे 6.60% आणि 6.82% होता. मागील वर्षी तो अनुक्रमे 3.90% आणि 3.97% होता. ऑगस्ट, 2022 मध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 6.16% आणि 6.21% होता . जुलै, 2022 मध्ये तो अनुक्रमे 5.38% आणि 5.44% होता. मागील वर्षीच्या याच महिन्यात तो 2.13% आणि 2.32% होता.
सप्टेंबर 2022साठी शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 20 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रसिद्ध होईल.
R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860965)
Visitor Counter : 278