माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दोआबा महाविद्यालयाचा 65 वा दीक्षांत समारंभ उद्या होणार
अनुराग सिंग ठाकूर 20 सप्टेंबर 2022 रोजी 65 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात जालंधरच्या दोआबा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करणार पदवी प्रदान
Posted On:
19 SEP 2022 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री, अनुराग ठाकूर हे दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे असतील. दोआबा महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदर मोहन अध्यक्षीय भाषण करतील. याशिवाय प्राचार्य डॉ.प्रदीप भंडारी वार्षिक अहवाल सादर करतील. दोआबा महाविद्यालयाला नॅक द्वारे A+ ग्रेड सायकल-II सह दिमाखात पुनर्मान्यता मिळाली आहे. दोआबा महाविद्यालय सातत्याने विकासाच्या नवनवीन वाटा पादाक्रांत करत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाला उत्कृष्टतेची क्षमता असलेल्या प्रतिष्ठित (CPE) महाविद्यालयाचा दर्जा दिला आहे. 2017 मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाद्वारे महाविद्यालयाला स्टार कॉलेज दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860700)
Visitor Counter : 159