युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 च्या अंतिम मुदतीत वाढ
प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आता 20 सप्टेंबर 2022 ऐवजी 27 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2022 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2022
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (RKPP) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक या यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी 27 ऑगस्ट 2022 रोजी प्रवेशिका मागवल्या होत्या. याबाबतची अधिसूचना मंत्रालयाच्या www.yas.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आता 20 सप्टेंबर 2022 ऐवजी 27 सप्टेंबर 2022 (मंगळवार) करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पात्र खेळाडू/प्रशिक्षक/संस्था/विद्यापीठांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. त्यांनी dbtyas-sports.gov.in या समर्पित पोर्टलवर ऑनलाइन प्रवेशिका पाठवणे आवश्यक आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन / भारतीय क्रीडा प्राधिकरण / मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ / क्रीडा प्रोत्साहन मंडळे / राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे इत्यादींना देखील त्यानुसार सूचित करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर 2022 नंतर प्राप्त झालेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860666)
आगंतुक पटल : 189