संरक्षण मंत्रालय
विजयकुमार सिंह यांनी माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2022 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2022
संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून विजय कुमार सिंह यांनी सप्टेंबर 19, 2022 रोजी कार्यभार स्वीकारला. सिंह हे पंजाब केडरचे 1990 च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी (आयएएस) असून, त्यांना 32 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासनाचा अनुभव आहे.

विजय कुमार सिंह यांनी अलीकडेच वस्त्रोद्योग मंत्रालयात विशेष सचिव म्हणून काम केले आहे. त्या पदावरील नियुक्ती पूर्वी त्यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात सहसचिव म्हणून काम केले होते. पंजाबमधील आपल्या कारकीर्दीत त्यांनी सशस्त्र दलाच्या सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी व्यापक संवाद साधला.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860592)
आगंतुक पटल : 249