विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अमेरिकेत होणाऱ्या ग्लोबल क्लीन एनर्जी ऍक्शन फोरममधे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील उर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि विज्ञान तंत्रज्ञान संयुक्त मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
18 SEP 2022 7:16PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या संयुक्त भारतीय मंत्रिस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत जागतिक स्वच्छ ऊर्जा उपाययोजना विषयक परीषदेत (ग्लोबल क्लीन एनर्जी ऍक्शन फोरम) सहभागी होण्यासाठी, अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.तेथे ते प्रख्यात शिक्षणतज्ञ तसेच अमेरीकास्थित भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत.
डॉ जितेंद्र सिंग उद्या संध्याकाळी अमेरिकेच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यावर वॉशिंग्टनला रवाना होणार असून तेथून ते पिट्सबर्ग आणि नंतर न्यूयॉर्कला रवाना होतील.

क्लीन एनर्जी मिनिस्ट्रियल (CEM13) आणि मिशन इनोव्हेशन (MI-7) ची सुप्रतिष्ठित संयुक्त बैठक 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया,येथे होणार आहे. स्वच्छ ऊर्जेच्या नव्या संकल्पना आणि त्या राबविण्यासाठी गती देण्याकरिता 30 हून अधिक देशांतील प्रमुख व्यवस्थापकीय संचालक,उदयोन्मुख, तरुण व्यावसायिक, समाजातील नागरीक आणि मंत्री यांच्यासह जगभरातील स्वच्छ ऊर्जेवर कार्य करणारे हजारो धुरीण या कार्यक्रमातून एकत्र येतील अशी अपेक्षा आहे.
आपल्या प्रयाणापूर्वीच्या निवेदनात, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की,देश आणि परदेशातील स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अलीकडील प्रगतीच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल क्लीन एनर्जी ॲक्शन फोरमच्या पूर्ण आणि गोलमेज बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहोत.ते म्हणाले, कोविड नंतरच्या काळात आणि अलीकडच्या हवामान बदलाच्या आव्हानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मानवजातीच्या उन्नतीसाठी स्वच्छ ऊर्जा उपायांमधे असलेल्या घनिष्ठ समन्वय आणि सहकार्याचा जोरदार पुरस्कार करत आहेत.
20 सप्टेंबर रोजी, यांनी डॉ जितेंद्र सिंह अमेरिकेतील अमेरिका -इंडिया व्यवसाय द्वारे आयोजित करण्यात येणार्या भू-स्थानिक, अंतराळ, पृथ्वी आणि महासागर विज्ञान, औषध निर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित सुमारे 35 कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि फेडरल प्रतिनिधींसोबत एक महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक आयोजित केली आहे.इंडिया हाऊसमध्ये भारतीय राजदूतांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या रात्रीच्या मेजवानीच्या वेळी ते प्रमुख यूएस फेडरल अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
21 आणि 22 सप्टेंबर रोजी, डॉ जितेंद्र सिंग ग्लोबल क्लीन एनर्जी ॲक्शन फोरममध्ये अनेक बैठकांमध्ये सहभाग होतील, ज्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वा अंतर्गत भविष्यात कमी-कार्बन उत्सर्जनाप्रती भारताची प्रतिबद्धता अधोरेखित करतील; ज्याचे उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील नवसंकल्पनांना गती देऊन देशाच्या ऊर्जा परिदृश्यात परिवर्तन घडवून आणणे हे आहे.
23 सप्टेंबर रोजी, "स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग" या विषयावर एक प्रमुख समारंभ सादर होईल, ज्यात डॉ जितेंद्र सिंग वाहतूक क्षेत्रातून हरीत गृह वायू (GHG) उत्सर्जन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या शाश्वत जैवइंधनाच्या भूमिकेवर बोलतील. प्रगत जैवइंधन आणि कचरा ते ऊर्जा तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास यासाठीच्या संशोधनाला समर्थन देण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागामार्फत भारत करत असलेल्या प्रयत्नांची रूपरेषा सादर करतील.
त्याच दिवशी, "इंडिया क्लीन एनर्जी शोकेस" वर आणखी एक कार्यक्रम होईल, ज्यात डॉ जितेंद्र सिंह भारत सरकारची स्वच्छ ऊर्जा भविष्याकडे वाटचाल आणि आकांक्षा सिध्द करण्यासाठी होत असलेल्या उपाय योजना सामायिक करतील.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860414)
आगंतुक पटल : 196