जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘स्वच्छता ही सेवा’ (एसएचएस) पंधरवडा मोहीमेचा प्रारंभ


एसएचएस ग्रामीण भारतातील संपूर्ण स्वच्छतेच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना गती देणार

Posted On: 16 SEP 2022 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022

जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने ग्रामीण भारतातील संपूर्ण स्वच्छतेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) ही पाक्षिक मोहीम सुरू केली आहे. साचलेला कचरा साफ करण्यासाठी आणि घन कचरा व्यवस्थापन उपक्रम राबवण्यासाठी ही एक मोठ्या प्रमाणातील सामुदायिक एकत्रीकरण मोहीम आहे. या वार्षिक मोहिमेचा भाग  म्हणून, राज्यांना पुढील उद्दिष्टांसह उपक्रम राबवण्याची विनंती केली जाते (i) उघड्यावरील शौच मुक्त (ओडीएफ) प्लस गावांसाठी सामुदायिक एकत्रीकरण आणि सहभागा द्वारे, जन आंदोलन सुनिश्चित करणे (ii) "संपूर्ण स्वच्छ" गावाचे महत्व प्रसारित करणे (iii)  स्वच्छता हे प्रत्येकाचे काम या संकल्पनेला बळकटी देणे आणि (v) गाव  पातळीवर स्वच्छ भारत दिवस (2 ऑक्टोबर) साजरा करणे. ही मोहीम कालपासून म्हणजेच, 15 सप्टेंबर पासून सुरु झाली असून ती 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.           

या संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री यांच्या सह-अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर 2022 रोजी राज्यांबरोबर आभासी परिषद (व्हीसी) देखील आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सहभागींना आवाहन केले की त्यांनी 15, 16 आणि 17 सप्टेंबर 2022 या समर्पित दिवसांमध्ये ‘श्रमदान’ म्हणून कचरा साचलेल्या जागा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करावी.

या अभियाना अंतर्गत गावांमध्ये पुढील महत्वाचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत:

  • गावांमधील कचरा साचलेल्या ठिकाणांची स्वच्छता
  • कचरा संकलन आणि विलगीकरण शेड/केंद्रांचे बांधकाम
  • पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्या आजूबाजूला वृक्षारोपण करणे
  • कचऱ्याच्या उगमस्थानी कचरा विलगीकरण (सुका आणि ओला) याबाबत सामुदायिक जागरुकता
  • जीईएमद्वारे ट्रायसायकल/ई-कार्ट (बॅटरीवर चालणारे वाहन) यासारखे कचरा संकलन वाहन खरेदी करणे
  • प्लास्टिक सारखा अ-विघटनशील कचरा दारोदारी जाऊन गोळा करणे
  • एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या (एसयुपी) दुष्परिणामांबद्दल ग्रामसभा आयोजित करून आणि एसयुपी वर बंदीचे ठराव पारित करून जनजागृती करणे
  • प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी 4R तत्त्वांचा प्रचार करणे- नकार देणे, कमी करणे, पुन्हा वापरणे आणि पुनर्निर्मिती करणे
  • ओडीएफ प्लस बाबत सरपंच संवाद आयोजित करणे
  • भित्ती चित्र, नुक्कड नाटक, स्वच्छता रथ, समाज माध्यम साहित्य, ग्राम सभा अशा व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून आयपीसी द्वारे जनजागृती करण्यासाठी व्यापक आयईसी आणि मास मिडिया मोहीम राबवणे
  • घोषवाक्य लेखन / "कचरा न टाकण्याची प्रतिज्ञा घेणे
  • एसएचएस पोर्टलवर एसएचएस उपक्रमांच्या दैनंदिन प्रगतीची अद्ययावत माहिती देणे        

 

S.Patil /R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1859952)
Read this release in: English , Hindi , Tamil , Urdu