विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देशातील 60 स्टार्ट अप उद्योगांना इन्स्पायर पुरस्कारांचे वितरण तसेच 53,021 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान
या नवोन्मेषी संशोधकांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासात संपूर्ण चिंतनविषयक पाठबळ पुरविण्यात येईल
Posted On:
16 SEP 2022 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात देशातील 60 स्टार्ट अप उद्योगांना इन्स्पायर पुरस्कारांचे वितरण केले तसेच 53,021 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान केली. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे देण्यात आले असून या नवोन्मेषी संशोधकांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासात संपूर्ण चिंतनविषयक पाठबळ पुरविण्यात येईल अशी ग्वाही देखील सरकारतर्फे देण्यात आली आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ष 2020-21 मध्ये जेव्हा आपला देश उर्वरित विश्वासह कोविड-19 संक्रमणाच्या भयानक संकटाशी लढत होता तेव्हा देखील वार्षिक इन्स्पायर – मानक (राष्ट्रीय आकांक्षा आणि माहितीला प्रोत्साहन देणारी लाखो मने)या स्पर्धेमध्ये देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांनी सुमारे 6.53 लाख अभूतपूर्व संकल्पना आणि अभिनव संशोधने मांडण्यात आली. ते म्हणाले की, या स्पर्धेमध्ये देशातील 702 जिल्ह्यांतील (96%)संकल्पना आणि नवोन्मेष सादर करण्यात आले. यामध्ये 124 आकांक्षित जिल्ह्यांपैकी 123 जिल्हे सहभागी झाले, मुलींचे यात 51%प्रतिनिधित्व होते तर देशाच्या ग्रामीण भागातील शाळांनी 84% आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यातर्फे संचालित शाळांनी 71% सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना 6.53 लाख विद्यार्थ्यांपैकी 53,021 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली जेणेकरून त्यांनी या योजनेत सादर केलेल्या संकल्पनांचे नमुने विकसित करता येतील. या योजनेची पुढची पातळी म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प त्यांच्या जिल्हा पातळीवरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेत तसेच राज्य पातळीवरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेत सादर करावे लागले. आणि आता एकूण 556 विद्यार्थ्यांनी 9व्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेत प्रवेश केला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
S.Patil /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859946)
Visitor Counter : 221