युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

फिट इंडिया मिशन, विधि आणि न्याय मंत्रालयाच्या सहयोगाने आंतर मंत्रालय, बार अँड बेंच बॅडमिंटन चॅम्पियनशिपला पाठिंबा देणार

Posted On: 16 SEP 2022 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022

फिट इंडिया मिशन, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सहयोगाने आंतर मंत्रालय, बार अँड बेंच बॅडमिंटन चॅम्पियनशिप या पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या स्पर्धेला पाठिंबा देऊन फिटनेसचा नवा मापदंड प्रस्थापित करणार आहे. या स्पर्धेत अन्य स्पर्धकांबरोबर मंत्री, न्यायाधीश आणि वकिलांचा सहभाग असेल. 

दोन दिवसांची ही स्पर्धा सप्टेंबर 17 रोजी दिल्ली येथील त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरु होणार असून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित राहतील.

माजी बॅडमिंटनपटू अबंतिका डेका यांनी कायदा आणि न्याय मंत्रालय आणि फिट इंडिया यांच्या भागीदारीने या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना डेका म्हणाल्या. माझ्या व्यावसायिक कारकि‍र्दीनंतरही, मला खेळासाठी योगदान देत राहायचे होते. फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या आपल्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाने मला या कार्यक्रमाची संकल्पना तयार करायला प्रवृत्त केले, जो समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना खेळ आणि फिटनेसबाबतच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला प्रोत्साहन देईल. या मालिकेत, आम्ही इतर मंत्रालयांबरोबर देखील यासारखेच कार्यक्रम आयोजित करणार आहोत. डेका राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेच्या (एनएडीए) सदस्य देखील आहेत.     

या कार्यक्रमात भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, न्यायमूर्ती विक्रम नाथ, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंग, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अंजू राठी राणा, कायदा आणि न्याय मंत्रालयाचे संयुक्त सचीव  सिंघी, दालमिया भारत लिमिटेडचे एमडी आणि सीईओ यांच्यासह विधी क्षेत्रातील अनेक नामवंत चेहऱ्यांचा देखील सहभाग दिसेल.

 

  

 

 

 

 

S.Patil /R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859854) Visitor Counter : 141