दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल पायाभूत सुविधा प्रदाते संघटनेच्या वार्षिक पथदर्शी कार्यक्रम 2022 मध्ये अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून आणि देवुसिंह चौहान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार
Posted On:
13 SEP 2022 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत उद्या आयोजित डिजिटल पायाभूत सुविधा प्रदाते संघटनेच्या (डीआयपीए) वार्षिक पथदर्शी कार्यक्रम 2022 मध्ये दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून तर दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान हे सन्माननीय अतिथी म्हणून .उपस्थित राहणार आहेत.
डिजिटल पायाभूत सुविधा प्रदाते संघटना, ही डिजिटल पायाभूत सुविधा पुरवठादारांची एक सर्वोच्च उद्योग संघटना असून या वर्षी “5जी आणि त्यापलीकडे गतिशक्तीचा दृष्टिकोन ” या नवीन संकल्पनेसह वार्षिक पथदर्शी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ही संघटना सज्ज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याशी पूर्णपणे सुसंगत अशी “5जी आणि त्यापलीकडे गतिशक्तीचा दृष्टिकोन” ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. गतिशक्तीमुळे देशातील दूरसंचार पायाभूत सुविधा अधिक भक्कम होण्यास मदत झाली आहे.
या कार्यक्रमादरम्यान आयोजित गट चर्चेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. प्रत्येकाच्या जीवनात आणि देशाच्या विकासात 5 जी च्या प्रभावाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हे तज्ज्ञ, या गटचर्चांच्या माध्यमातून सामायिक करतील.
14 सप्टेंबर 2022 रोजी हॉटेल द इम्पीरियल, जनपथ, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला डिजिटल पायाभूत सुविधा प्रदाते संघटनेचा वार्षिक पथदर्शी कार्यक्रम दुपारी 2.30 पासून सुरू होईल.
***
S.Kakade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859010)
Visitor Counter : 211