सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

अंमली पदार्थांविरोधात जागृतीसाठी एनसीसी कॅडेट्सच्या सहभागासंदर्भात झालेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात देशभरातील सर्व एनसीसी राज्य संचालनालयांसह एनसीसी कॅडेट्स आणि तरुण सहभागी

Posted On: 12 SEP 2022 10:26PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थांचे घातक परिणाम तरुणांपर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज तसेच, तरुणांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा असलेला प्रचंड प्रभाव लक्षात घेऊन, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर (DAIC) इथं आज एनसीसी कॅडेट्सशी संवाद आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोगाविरुद्ध सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित केला होता. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002K1CR.jpg

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी संयुक्तरित्या या संवादात्मक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. देशातील एनसीसीच्या अनेक राज्य संचालनालयांनी लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00392LL.jpg

एनसीसी कॅडेट्सच्या सक्रिय सहभागातून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने हे अभियान नव्या उंचीवर जाईल आणि नशा मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल, अशी अपेक्षा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

अमली पदार्थांचे व्यसन ही समाज आणि कुटुंबासाठी मोठी समस्या असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. एनसीसी कॅडेट्सनी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांसह जनतेला अशा व्यसनांच्या परिणामांची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

विविध राज्यांच्या समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव, डॉ. आंबेडकर अध्यासन शैक्षणिक संस्था तसेच, इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील एनसीसी कॅडेट्स आणि तरुणांना या संवाद आणि प्रतिज्ञा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्याची सुविधा देण्यास सांगण्यात आले होते.  देशभरातील हजारो एनसीसी कॅडेट्स आणि तरुणांनी या कार्यक्रमात  सहभाग घेतला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0040A45.jpg

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग हा भारत सरकारमधील समाजातील अंमली पदार्थाचे व्यसन कमी करण्याविषयीच्या उपाययोजना राबवणारा नोडल विभाग आहे. तरुण, मुले आणि एकूण समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, सरकारने 15 ऑगस्ट 2020 रोजी निवडक  272 जिल्ह्यांमध्ये  नशा मुक्त भारत अभियान (NMBA) सुरू केले. आतापर्यंत 3 कोटी युवक, 2 कोटी महिला आणि 1.59 लाख शैक्षणिक संस्थांसह 8 कोटींहून अधिक लोक या अभियानात सहभागी झाले आहेत.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858831) Visitor Counter : 131


Read this release in: English , Urdu , Hindi