विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतीचे आदानप्रदान होण्याच्या दृष्टीने डॅशबोर्डची स्थापना करण्याची केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची घोषणा
Posted On:
11 SEP 2022 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये तंत्रज्ञानातील सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान होण्याच्या दृष्टीने डॅशबोर्डची स्थापना करण्याची घोषणा केली.
अहमदाबाद मधील सायन्स सिटी इथे आयोजित केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या दोन दिवसीय संमेलनाच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की या परिषदेत उहापोह केलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासह परीक्षण आणि देखरेख करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने एक उच्च स्तरीय यंत्रणा विकसित केली जाईल.

त्याचबरोबर प्रत्येक राज्याने सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती जाणून घेण्यासह या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी विशेष समितीशी समन्वय साधून सहकार्य करण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी सूचना मंत्र्यांनी केली.
दोन दिवसीय 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे' औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल सायन्स सिटी, अहमदाबाद येथे झाले.
कृषी, निःक्षारीकरण सारखे तंत्रज्ञान वापरून शुद्ध पेय जल सुविधा उपलब्ध करण्यासाठी संशोधन, भूजल पातळी, पाण्याचे प्रमाण, गुणवत्ता आणि माहिती प्रदान करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या हेल बोर्न पद्धतीचा अवलंब, हायड्रोजन अभियानात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेसह सर्वांसाठी स्वच्छ ऊर्जा, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे खोल समुद्र अभियान आणि त्याची किनारपट्टीलगतच्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना असणारी समर्पकता, सर्वांसाठी डिजिटल आरोग्य सेवा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विज्ञान यांच्यात साधलेला समन्वय, या मुद्द्यांवर राज्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांसोबतच्या महत्त्वाच्या पूर्ण सत्रांमध्ये तपशीलवार चर्चा झाल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त केले.

देशभरातील 100 हून अधिक स्टार्ट अप्सच्या आणि उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद मधील केंद्र-राज्य विज्ञान परिषदेत एक विशेष सत्र झाले. या सत्रात कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक उपाय, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञानावर आधारित उपाय योजना, एकल-वापर प्लास्टिकला पर्याय, सिंचन आणि डिजिटल आरोग्य यासह इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. अनेक राज्य सरकारांनी काही तंत्रज्ञानामध्ये उत्सुकता दाखवली असून राज्याशी निगडित काही ठराविक तांत्रिक उपाययोजनांमध्ये काही स्टार्ट अप्सबरोबर भागीदारी करायला देखील सहमती दर्शवली आहे.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858555)
Visitor Counter : 209