विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
स्टार्ट-अप्सची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी स्टार्टअप्सना प्रारंभापासूनच समान भागधारक म्हणून उद्योगाशी संलग्न करण्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2022 6:48PM by PIB Mumbai
स्टार्ट-अप्सची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी स्टार्टअप्सना प्रारंभापासूनच समान भागधारक म्हणून उद्योगाशी संलग्न करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी केले.

अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 2 दिवसीय "केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या " पहिल्या दिवशी विविध राज्यांतील मंत्र्यांच्या नेतृत्व सत्राचे अध्यक्षपद भूषवताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, त्यांचे मंत्रालय देशभरातील स्टार्ट-अप्सपर्यंत तत्परतेने पोहोचत आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि स्टार्ट-अप्सकडून 50-50 गुंतवणूक व्यवस्थेसह इन्क्युबेशन आणि दर्जेदार संशोधनासाठी प्रारंभिक निधी उपलब्ध करून देत आहे.
त्यापूर्वी, अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 दिवसीय 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे' औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
अहमदाबाद येथील केंद्र-राज्य विज्ञान परिषदेमध्ये 100 हून अधिक स्टार्ट-अप्स आणि उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतचे विशेष सत्र राज्यनिहाय विशिष्ट समस्यांवर त्या-त्या राज्यांसाठी खास उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.
सगळ्या 6 विज्ञान विभागांकडून सर्व भागधारकांकडून प्राप्त होणाऱ्या निधीसह राज्य सरकारांसोबत काम करण्यास इच्छुक संभाव्य स्टार्ट-अप्सना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
संशोधन, स्टार्ट-अप, शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांचे एकत्रीकरण हा आता पर्याय नव्हे तर देशातील तरुण नवोन्मेषकांना आकर्षित करण्याची, विशेषत: राज्यांमध्ये अत्याधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादने आणि उपाय विकसित करण्यासाठी ती आता नितांत गरज ठरल्याचे, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. "2030 पर्यंत संशोधन आणि विकास क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट करणे" आणि देशाच्या आणि राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेला पूरक बनवणे हा या परिषदेचा, केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाशी सुसंगत मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यांच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिक नवोन्मेष कार्यशाळा स्थापन करण्यासाठी या परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देत ,केंद्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राज्यांमध्ये सुविधायुक्त नवोन्मेष केंद्रे स्थापन करण्याच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्यासह सर्व मदत करेल असे आश्वासन डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिले.
स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारताला जगातील अग्रणी देश बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अमृत काळामध्ये भारताला संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी ही दोन दिवसीय विज्ञान परिषद भारतीय तरुणांच्या अंगभूत क्षमता आणि नवोन्मेषी वृत्तीवर लक्ष केंद्रित करेल, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858330)
आगंतुक पटल : 215