वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-प्रशांत महासागर क्षेत्रीय आर्थिक रचना समूहाची मंत्रीस्तरीय (आयपीईएफ) बैठक समावेशक आणि फलदायीः पियुष गोयल


आयपीईएफच्या 14 देशांचा हा समूह भविष्यात देशांतर्गत व्यापाराचे नियम तयार करेल ज्याचा विश्वास सर्वांना समान संधी, पारदर्शकता आणि नियमाधिष्ठित व्यापारावर आहेः गोयल

गोयल यांची ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांसमवेत भेट; द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा

Posted On: 10 SEP 2022 12:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत प्रशांत महासागर क्षेत्रीय आर्थिक रचना गटात झालेली चर्चा फलदायी झाल्याचे म्हटले आहे. समविचारी, नियमाधिष्ठित, पारदर्शक आणि भारत प्रशांत महासागर क्षेत्रात खुले आणि सामायिक स्वारस्य असलेल्या देशांन एकत्र आणण्यासाठी ही बैठक होती.

चर्चेच्या सर्व परिघांमध्ये भारताने सर्वांगीण सहभाग घेतला, यावर प्रकाश टाकून गोयल यांनी सांगितले की, पुरवठा साखळीशी संबंधित  चार पैकी तीन स्तंभावर कर, भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि स्वच्छ उर्जा यावर चर्चा  झाली. भारताला यातून निघालेल्या परिणाम आणि संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर समाधान असून घोषणापत्रात सहभाग घेतला.

व्यापाराशी संबंधित अशा एका आधारस्तंभावर, मंत्रीमहोदय म्हणाले की, चौकटीची रूपरेषा म्हणजे पर्यावरण, श्रमशक्ती, डिजिटल व्यापार आणि सार्वजनिक अधिग्रहण याबाबतीत आवश्यक कटिबद्धतांवर अजूनही काम सुरू आहे.

मंत्री म्हणाले की, सदस्य देश यातून कोणते लाभ मिळवणार आणि पर्यावरणाच्या बाबतीत कोणत्याही शर्तींमुळे विकसनशील देशांच्या संदर्भात पक्षपात होऊ शकतो का, हे पैलू आम्हाला पहावे लागतील.  कारण विकसनशील  देशांकडे आमच्या वाढत्या अर्थव्यवस्थांच्या गरजा भागवण्यासाठी स्वस्त किमतीत आणि परवडणारी उर्जा पुरवणे अत्यंत आवश्यक आहे.

गोयल  यांनी आयपीईएफच्या व्यापारी मार्गावरून चालताना, भारत विशेषतः खासगीपणा आणि विदा याबाबतीत आमची स्वतःची डिजिटल रचना आणि कायदे मजबूत करण्यात गुंतला आहे, ही बाब अधोरेखित केली. भारत अंतिम रूपरेषा काय उदयास येते, यासाठी आम्ही प्रतीक्षा करू, असे सांगितले. दरम्यान, अधिकारी खुल्या मनाने आणि भारताची जनता तसेच देशाचे  आणि व्यवसायांचे हित लक्षात घेऊनच चर्चेत सहभागी होतील, असे गोयल यांनी पुढे सांगितले.

एका प्रश्नाला उत्तर देताना, गोयल यांनी सांगितले की, विकसित देशांच्या विशिष्ट जबाबदार्या कोणत्याही अशा कराराचा अंतर्गत भाग असल्या पाहिजेत आणि हा भाग असा आहे की त्यावर जास्त सखोल चर्चा होणे आवश्यक आहे.

मे 2022 मध्ये समूह स्थापन झाल्यापासून सप्टेंबरमध्ये  भविष्यातील चर्चेच्याबाबतीत व्यापक रूपरेषा ठरवण्यापर्यंत पहिल्या मंत्रीस्तरीय ज्या गतीने काम केले, त्याबद्दल गोयल यांनी सदस्य देशांची प्रशंसा केली. मंत्र्यांनी अमेरिका आणि अमेरिका वाणिज्य मंत्री गीना रैमोंडो तसेच अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरिन ताय यांच्या आयपीईएफला यशस्वी करण्यासाठी जी अजोड कटिबद्धता दाखवली आणि केलेली चर्चा ही समावेशक स्वरूपाची असल्याबद्दल यांची प्रशंसा केली. संपूर्ण चर्चा आणि वाटाघाटींमध्ये त्यांची भूमिका ही भारताच्या बाजूची होते, असे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, 14 देशांचा हा समूह सर्वांना समान संधी, पारदर्शकता आणि नियमाधिष्ठित व्यापारावर विश्वास ठेवत असून हाच समूह भविष्यातील व्यापारासंबंधी नियम तयार करेल. गोयल यांनी ऑस्ट्रेलियन व्यापार मंत्री डॉन फॅरेल यांची लॉसएंजल्समध्ये आज आयपीईएफच्या बैठकीच्या निमित्ताने आले असतानाच भेट घेतली.

आमच्यातील व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध हे आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केल्यामुळे प्रबळ झाले आहेत. आयपीईएफ अंतर्गत द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याला आणखी चालना देण्याच्या मार्गावंर चर्चा केली, असे त्यांनी जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

गोयल यांनी मंत्रीस्तरीय बैठकीच्या निमित्ताने इंडोनेशियाचे आर्थिक व्यवहार विषयक समन्वयक मंत्री एअरलांगा हरतार्तो यांच्याशी संवाद साधला. आयपीईएफच्या अंतर्गत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा  विस्तार करण्यावर तसेच भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आर्थिक सहकार्याला आणखी चालना देण्यावर चर्चा केली, असे मंत्र्यांनी ट्विट केले आहे.

गोयल यांनी जगातील सर्वात व्यस्त सागरी बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या लॉसएंजल्स या बंदरालाही भेट दिली. भारताच्या बंदर क्षेत्रात  जे विस्तारित केले जात आहे आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी उन्नत केले जात आहे, गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.भारत आणि अमेरिका व्यापार आणि गुंतवणूक संबंध आणखी पक्के करून पुनरूज्जीवित जागतिक पुरवठा साखळी बनवण्याकडे उत्सुकतेने पहात आहेत, असे गोयल यांनी ट्विट केले आहे.

***

A.Chavan/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858273) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil