नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तम प्रवासी सेवेसाठी तुतीकोरीन विमानतळाचे अद्यायावतीकरण होणार

Posted On: 09 SEP 2022 12:06PM by PIB Mumbai

 

वाढती प्रवासी वाहतूक आणि चांगली सेवा आणि संपर्क व्यवस्थेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, तामीळनाडूमधील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या तुतीकोरीन विमानतळाचे मोठ्या स्तरावरील अपग्रेडेशन, अर्थात अद्ययावतीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये, A-321 प्रकारच्या विमानांसाठी धावपट्टीचा विस्तार, नवीन एप्रन, नवीन टर्मिनल इमारत, तांत्रिक ब्लॉक वजा कंट्रोल टॉवर आणि नवीन फायर स्टेशनचे बांधकाम, या कामाचा समावेश असून त्यासाठी 381 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

13500 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली नवीन टर्मिनलची इमारत गर्दीच्या वेळी 600 प्रवासी हाताळण्यासाठी सक्षम असेल. ही इमारत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी परिपूर्ण असेल. तसेच या ठिकाणी दोन एरोब्रिजसह कार पार्किंग सुविधा आणि नवीन प्रवेश मार्गाची तरतूद असेल.   

या प्रदेशातील प्रसिद्ध चेट्टीनाड घरांद्वारे प्रेरणा घेत, नवीन टर्मिनलचे स्वरूप, दक्षिणेकडेच्या प्रदेशाची एक नवीन स्थापत्त्यशास्त्रीय ओळख निर्माण करेल, आणि टर्मिनलच्या रचनेला नवीन आयाम देईल. इमारतीच्या वास्तुरचनेमधून स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक स्थापत्त्य कलेचे  संदर्भ व्यक्त होतील. इमारतीचा अंतर्गत भाग विविध समकालीन साहित्य आणि पोत याच्या माध्यमातून शहराचे रंग आणि संस्कृती प्रतिबिंबित करेल. नवीन टर्मिनल चार तारांकित GRIHA मानांकित, शाश्वततेची वैशिष्ट्य असलेली ऊर्जा सक्षम इमारत असेल.

विमानतळ विकास प्रकल्पामध्ये सध्याच्या धावपट्टीचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, A-321 प्रकारची विमाने उतरवण्यासाठी आणि त्यांच्या उड्डाणासाठी विमानतळ सक्षम बनवणे याचा  देखील समावेश आहे. नवीन विमान वाहतूक नियंत्रण (एटीसी) टॉवर वजा टेक्निकल ब्लॉक, फायर स्टेशन, आयसोलेशन बे आणि ए-३२१ प्रकारची विमाने लावण्यासाठी पाच एअरक्राफ्ट पार्किंग बे बांधणे हा देखील या प्रकल्पाचा एक भाग आहे.

दक्षिण तमिळनाडू प्रदेशात मदुराईच्या पलीकडे तुतीकोरीन हे एकमेव विमानतळ आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणामुळे केवळ स्थानिक नागरिकांच्या विमानतळाच्या अद्ययावतीकरणामुळे स्थानिक समुदायाची वाढीव प्रवासी सेवांची मागणी तर पूर्ण होईलच पण तुतीकोरीन आणि तिरुनेलवेली, तेनकासी आणि कन्याकुमारी यासारख्या शेजारील जिल्ह्यांमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल. विमानतळाचे अद्ययावतीकरण आणि विस्तारीकरणासाठीचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Widening & Strengthening of Runway

Extension of Runway – Work in progress

Terminal Building -Work in Progress

 

Perspective View- Facade

 

Check-In Area

 

Security Hold Area

 

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858007) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu