संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह येत्या 8 सप्टेंबर रोजी टोकियो येथे होणाऱ्या भारत-जपान यांच्यातील 2+2 मंत्रीस्तरीय बैठकीत होणार सहभागी.
संरक्षण मंत्र्यांच्या जपानी समकक्षांशी स्वतंत्रपणे संवाद साधण्यासाठी द्विपक्षीय चर्चेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2022 8:54AM by PIB Mumbai
मंगोलियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी चार दिवसांच्या अधिकृत जपान भेटीसाठी रवाना होत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिनांक 08 सप्टेंबर 2022 रोजी टोकियो येथे होणाऱ्या दुसऱ्या भारत-जपान 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होतील. जपानचे प्रतिनिधीत्व त्या देशाचे संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा आणि परराष्ट्र व्यवहार श्री योशिमासा हयाशी,हे करणार आहेत.
हा द्विपक्षीय संवाद (2+2) सर्व क्षेत्रांमधील सहकार्याचे पुनरावलोकन करेल तसेच पुढील मार्गाची आखणी करेल. भारत आणि जपान हे एकमेकांसोबत विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या वर्षी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहेत.
द्विपक्षीय संवादाव्यतिरिक्त, राजनाथ सिंह वेगवेगळ्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या जपानी समकक्षांशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेणार आहेत.
संरक्षण मंत्री टोकियो येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या सामुदायिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत आणि जपानस्थित भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.
***********
Suvarna B./Sampada P./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1857340)
आगंतुक पटल : 273