आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला एकूण 213.91 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 4.05 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 50,594

गेल्या 24 तासांत 5,379 नव्या कोविड रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.70 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.00 टक्के

Posted On: 07 SEP 2022 9:25AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  213.91 कोटीहून (2,13,91,49,934) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे. आणि एकूण 2,81,13,254 सत्रांतून हे साध्य केले आहे.


12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण  16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.05 कोटी (4,05,07,953) किशोर वयातील मुलांना कोविड-19  चा पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा  देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.


आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,361

2nd Dose

1,01,09,378

Precaution Dose

68,26,177

FLWs

1st Dose

1,84,35,202

2nd Dose

1,77,03,732

Precaution Dose

1,32,85,004

Age Group 12-14 years

1st Dose

4,05,07,953

2nd Dose

3,05,74,338

Age Group 15-18 years

1st Dose

6,17,45,431

2nd Dose

5,25,16,492

Age Group 18-44 years

1st Dose

56,07,74,923

2nd Dose

51,38,30,904

Precaution Dose

7,05,36,509

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,40,089

2nd Dose

19,64,98,608

Precaution Dose

3,85,32,884

Over 60 years

1st Dose

12,76,07,317

2nd Dose

12,28,27,616

Precaution Dose

4,24,83,016

Precaution Dose

17,16,63,590

Total

2,13,91,49,934

 

 भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 50,594इतकी आहे. देशातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.11 टक्के इतकी आहे.


परिणामी, भारतात रुग्ण  कोविडमुक्त होण्याचा दर 98.70 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत,7,094 रूग्ण कोविडमुक्त झाले असून बरे झालेल्या कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या  आरंभापासून) आता 4,38,93,590 इतकी आहे.


गेल्या 24 तासांत, 5,379 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.


गेल्या 24 तासांत, 3,21,917 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 88.80 कोटी (88,80,68,681) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.00 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.67 टक्के इतका नोंदवला गेला आहे

***

Suvarna B./Sampada P./CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857307) Visitor Counter : 123