कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकूण कोळसा उत्पादन ऑगस्ट 2022 मध्ये 8.27% ने वाढून 58.33 दशलक्ष टन झाले


पंचवीस खाणींमधील उत्पादन 100 टक्क्यांच्या वर

Posted On: 05 SEP 2022 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2022

 

देशातील एकूण कोळसा उत्पादन  ऑगस्ट 2021 च्या 51.62 मेट्रिक टनच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये 8.27%  ने वाढून 58.33 दशलक्ष टन झाले आहे.  तात्पुरत्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये कोल इंडिया लि. आणि कॅप्टिव्ह माईन्स/ इतरांनी  अनुक्रमे 8.49 % आणि 27.06% वाढ नोंदवत  अनुक्रमे 46.22 आणि  8.02 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन घेतले.  मात्र सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेडने या  महिन्यामध्ये 17.49% ची नकारात्मक वाढ नोंदवली. 

प्रमुख 37 कोळसा उत्पादक खाणींपैकी  25  खाणींनी 100% पेक्षा जास्त उत्पादन घेतले तर इतर पाच खाणींचे उत्पादन 80 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान राहिले. त्याचबरोबर, कोळसा पुरवठा ऑगस्ट 2021 मधील 60.18 मेट्रिक टनच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये  5.41% वाढून 63.43 झाला. ऑगस्ट 2022 मध्ये, कोल इंडिया लि. आणि कॅप्टिव्ह माईन्स/ इतरांनी  अनुक्रमे 5.11% आणि 26.29% ची वाढ नोंदवत 51.12 मेट्रिक टन आणि  8.28 मेट्रिक टन कोळसा पाठवला.

विजेची मागणी  वाढल्यामुळे वीज निर्मिती केंद्रांना ऑगस्ट 2021 मधील 48.80 मेट्रिक टनच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये 10.84% पेक्षा अधिक म्हणजेच  54.09 मेट्रिक टन  कोळसा पाठवण्यात आला. 

 

एकूण वीजनिर्मिती : 

ऑगस्ट 2021 मधील वीज निर्मितीच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये  3.14% अधिक आहे. मात्र ऑगस्ट 2022 मध्ये कोळशावर आधारित वीजनिर्मिती जुलै 2022 मधील 86039 एमयूच्या तुलनेत 85785 एमयू  झाली आहे आणि त्यात 0.30% किरकोळ नकारात्मक वाढ नोंदवली गेली.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856882) Visitor Counter : 149