रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अपूर्ण चाचण्यांसह नॅनो युरियासाठी त्वरित मंजुरी दिली जाते अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि या विषयावरील विद्यमान तथ्ये आणि डेटाचे आंशिक तथ्य सादर करणाऱ्या आहेत


खत नियंत्रण आदेश (FCO), 1985 नुसार खताच्या नोंदणीसाठी स्थापित आणि विद्यमान प्रक्रिया पूर्णपणे पाळल्या जातात

Posted On: 04 SEP 2022 9:18PM by PIB Mumbai

 

एका अग्रगण्य राष्ट्रीय दैनिकाने आज दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित केले आहे ज्यात असा आरोप करण्यात आला आहे की अपूर्ण चाचण्या असूनही नॅनो युरियाला त्वरित मंजुरी दिली जाते ही बातमी  चुकीची आहे. यात चुकीची माहिती दिलेली आहे आणि  ती या विषयावरील विद्यमान तथ्ये आणि डेटाचे आंशिक दृश्य प्रस्तुत करते.

ही प्रक्रिया फास्ट ट्रॅककरण्यात आल्याचे यासंबंधीच्या वृत्तात चुकीचे नमूद करण्यात आले आहे. यावर विभागा कडून हे स्पष्ट केले आहे की, खत नियंत्रण आदेश (FCO), 1985 नुसार अधिसूचनेसाठी कोणत्याही खताच्या नोंदणीसाठी स्थापित आणि विद्यमान कार्यपद्धती पूर्णपणे विचारात घेतली गेली आहे. नॅनो युरियाला FCO अंतर्गत तात्पुरते अधिसूचित केले गेले आहे जे FCO, 1985 अंतर्गत खते सादर करण्याच्या विद्यमान प्रक्रियेवर आधारित आहे ज्यासाठी फक्त दोन हंगामातील डेटा आवश्यक आहे.भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR आणि राज्य कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या उत्साहवर्धक परिणाम आणि अभिप्रायाच्या आधारे नॅनो यूरियाला FCO अंतर्गत तात्पुरते अधिसूचित केले गेले आहे. केंद्रीय खत समिती (CFC), कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA आणि FW) ने देखील या संदर्भात डेटा आणि योग्य विचारविमर्शाच्या आधारे शिफारस केली आहे. याव्यतिरिक्त, जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) ला सुरक्षा आणि जैवसुरक्षा समस्यांसाठी देखील संदर्भित केले गेले आहे. परिणामी, जैवसुरक्षा आणि बायोटॉक्सिसिटीच्या बाबतीत समाधान झाल्यानंतरच नॅनो युरियाला, नॅनो खताच्या स्वतंत्र श्रेणीच्या रूपात FCO अंतर्गत आणले गेले आहे.

शिवाय, बातम्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने हे सांगण्यात आले आहे की, डेटा दोन हंगामांपुरता मर्यादित आहे, मात्र त्यात तथ्य नाही.  कारण यासंदर्भात संशोधन आणि शेतकरी क्षेत्रीय चाचण्या गेल्या चारपेक्षा जास्त हंगामांपासून सुरू आहेत.

मातीच्या आरोग्यास/प्रजनन स्थितीला कोणतेही नुकसान न होता सातत्यपूर्ण परिणाम नोंदवले गेले आहेत.

Table 1. Season wise / Crop wise - Experimental trials undertaken

Experiments

Season

Crops & Trials (Nos.)

“On Station” Trials

Rabi 2019-20

(24 Nos.)

Cereals:  Wheat (11);

Oilseeds:  Mustard (1);

Vegetables: Onion (2); Capsicum (1), Cabbage (1), Tomato (3); Parthenocarpic Cucumber under polyhouse (1)

Sugar Crops: Suru Sugarcane (1)

Summer 2019-20

(3 Nos.)

Cereals: Paddy (1); Maize (2)

Kharif 2020

(16 Nos.)

Cereals: Paddy (6); Maize (5); Pear millet (3)

Fibres: Cotton (1)

Vegetables: Okra (1)

Rabi 2020-21

(8 Nos.)

Cereals:  Wheat (6);

Oilseeds:  Mustard (1);

Vegetables: Onion (1)

Summer 2020-21

(2 Nos.)

Cereals: Paddy (1); Maize (1)

Kharif 2021

(21 Nos.)

See Table 2.

 

Rabi 2021-22

(19 Nos.)

Wheat (8); Rapeseed/ Mustard (3); Onion (1); Groundnut (1); Sunflower (1); Ginger (1), Turmeric (1), Sugarcane (1), Paddy(1), Maize (1)

 

Kharif- 2022

(7 Nos.)

Paddy (3); Apple (1), Bajra (1); Fingermillet (2)

 

Rabi -2022-23

(6 Nos.)

Continued

“On Farm”

Trials

Rabi 2019-20

93 crops; 11224 trials (9037 recorded)

Kharif 2020

44 crops; 1511trials (1435 recorded)

Rabi 2020-21

34 crops; 1126 trials

Total

11,598 Trials

 

नॅनो युरियाच्या मूल्यमापनासाठी, प्रीमियम ICAR संशोधन संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठे नॅनो युरिया चाचण्यांमध्ये आघाडीवर आहेत. पीक उत्पादकतेशी संबंधित विविध पैलू; या चाचण्यांद्वारे खतांच्या मात्रा मध्ये घट, शेतकऱ्यांचा नफा यावर लक्ष दिले गेले आहे. नॅनो युरिया चाचण्यांमध्ये समाविष्ट काही प्रमुख संशोधन संस्था/एसएयूंची यादी खालीलप्रमाणे आहे (तक्ता 2).

SN

Crops

Location

Season/ Year Onwards

 
 

1

Maize

ICAR-  CRIDA, Hyderabad, Telengana

Kharif 2021

 
 

2

Fingermillet

AICRPDA Centre, Bengaluru

Kharif 2021

 
 

3

Upland Rice

AICRPDA Centre, Jagdalpura, Chattisgarh

Rabi  2021-22

 
 

4

Irrigated Rice

IRRI-ISARC,Varanasi

Kharif 2021

 
 

5

Rainfed Rice

IRRI-ISARC,Varanasi

Kharif 2021

 
 

6

Rainfed Rice

IRRI-ISARC, Assam

Kharif 2021

 
 

7

Wheat

CSSRI Karnal, Haryana

Rabi 2020-21

 
 
 

8

Paddy

CSSRI Karnal, Haryana

Kharif 2021

 
 

9

Wheat

AAU, Anand, Gujarat

Rabi 2019-20

 
 

10

Maize

AAU, Anand, Gujarat

Kharif 2021

 
 

11

Wheat

ANDUAT, Ayodhya, UP

Rabi 2019-20

 
 

12

Wheat

MPUAT, Udaipur, Rajasthan

Rabi 2019-20

 
 

13

Wheat

SKNAU, Jobner, Rajasthan

Rabi 2019-20

 
 

14

Wheat

IARI, New Delhi

Rabi 2019-20

 
 

15

Mustard

IARI, New Delhi

Rabi 2019-20

 
 

16

Pearlmillet

IARI, New Delhi

Kharif 2019-20

 
 

17

Wheat

BAU, Ranchi

Rabi 2019-20

 
 

18

Paddy

UAHS, Shivamoga, Karnataka

Rabi 2019-20

 
 

19

Paddy

TNAU ( Bhavanisagar Stn.) Drone Expt

Kharif 2021

 
 

20

Maize

UAS GKVK, Karnataka

Summer 2019-20

 
 

21

Maize

PJTSAU, Telengana

Summer 2019-20

 
 

22

Onion

MPKVV, Rahuri, Maharashtra

Rabi 2019-20

 
 

23

Cabbage

IIHR, Bengaluru, Karnataka

Rabi 2019-20

 
 

24

Cucumber

IIHR, Bengaluru, Karnataka

Rabi 2019-20

 
 

 

विविध ठिकाणी आणि कृषी-हवामानाच्या प्रदेशांमध्ये नॅनो युरिया द्रव (नॅनो एन) च्या वापरल्या गेलेल्या परिणामांच्या सारांशावरून असे दिसून आले आहे की, तांदूळ, गहू, मका, टोमॅटो, काकडी आणि शिमला मिरची इत्यादी पिकांच्या वाढीच्या , महत्त्वाच्या टप्प्यांवर नॅनो युरियाचा पानांवर (फॉलीअर) वापरामुळे नायट्रोजनयुक्त खतांचा वापर कमी होतो आणि गव्हाचे उत्पादन 3-23% ,टोमॅटोमध्ये 5-11%; तांदूळ मध्ये 3-24 %; मक्यामध्ये 2-15%, काकडीत 5% आणि सिमला मिरचीमध्ये 18% पर्यंत वाढते.

विज्ञान आणि वैज्ञानिक प्रयत्न ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत संकल्पनेपासून अगदी शेवटच्या  टप्प्यापर्यंत महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जातात. नॅनो खते ही सध्या सुरू असलेल्या सघन कृषी पद्धतींमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठ्या संधी देतात.  त्यामुळे नॅनो युरिया सारख्या नॅनो खतांना ,रासायनिक खतांची घटती पोषक वापर कार्यक्षमता (NUE) आणि शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याची गरज असलेल्या पर्यायी उपायांच्या दृष्टीकोनातून समग्रपणे पाहिले जाते.

***

G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856701) Visitor Counter : 313


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi