शिक्षण मंत्रालय

बाली येथील जी 20 देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत धमेंद्र प्रधान यांनी केले भाषण

Posted On: 01 SEP 2022 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडोनेशियातील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी 20 समूहातल्या देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये उद्घाटन सत्रामध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी ‘पुनर्प्राप्ती, पुनर्कल्पना आणि पुनर्बांधणी’ या विषयावर विचार व्यक्त केले. 

नव्याने जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे महत्वाचे आहे, असे सांगताना त्यांनी परस्परांमध्ये अनुभवांची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. तसेच जगासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण हा सर्वात महत्वाचा, मध्यवर्ती बिंदू आहे, असे केंद्रीय मंत्री प्रधान यांनी सांगितले. भारतामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या अंमलबजावणीच्या माध्यमातून अधिक लवचिक शैक्षणिक आणि कौशल्य परिसंस्था तयार केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विचार करून शिक्षण देण्याच्या दिशेने भारत वेगाने प्रगती करीत आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.  

भारतामध्ये विशेषत्वाने बाल्यकाळामध्ये घेण्यात येणा-या काळजीविषयी आणि शैक्षणिक औपचारिकता, दिव्यांग बालके, डिजिटल आणि बहुशाखीय शिक्षण यांना अधिक प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी प्रवेशासंबंधी लवचिक धोरण, याचा शिकण्यासाठी प्रभावी परिणाम होवू शकणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे भारतातल्या शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय बनण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे. अहमदाबादमधील गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांचा शिक्षण परिसर बनवून भारतामध्ये परदेशी शिक्षण संस्थांचे स्वागत करण्यात येत आहे. परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचा परिसर तयार करण्याची परवानगी देण्यासंदर्भात धोरणात्मक उपाय योजना, प्रक्रिया  केली जात आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात दिली.

  UAE2022-09-01 18:26:44.438000

सध्याच्या 21 व्या शतकाचा विचार करून त्यासाठी आवश्यक कौशल्यांबरोबर मिळती-जुळती शिक्षण प्रणाली तयार करण्यासाठी जी 20 देशांबरोबर एकत्रित कार्य करण्यासाठी भारताची वचनबद्धता प्रधान यांनी अधोरेखित केली. जी 20च्या शैक्षणिक आघाडीच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही प्रधान यांनी पुढे सांगितले.    

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856117) Visitor Counter : 139