पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

जगभरामध्ये मजबूत सुधारणा आणि लवचिकता यासाठी एकत्रित काम करण्याची गरज - बाली येथे जी 20 गटातील देशांच्या पर्यावरण आण्णि हवामान मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन


पर्यावरणीय आव्हानाचा सामना करण्यासाठी उचललेले पाऊल हे राष्ट्रीय परिस्थिती आणि प्राधान्य लक्षात घेऊन समान आणि सामान्य मात्र वेगळ्या जबाबदा-या आणि संबंधित क्षमतेला अनुसरून असायला हवे - केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री

वैश्विक स्तरावर सामान्यांच्या कल्याणासाठी समन्वयातून शाश्वत कृतीची आवश्यकता - भूपेंद्र यादव

Posted On: 01 SEP 2022 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

केंद्रीय पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल इंडोनेशियामध्ये बाली येथे झालेल्या जी 20 समूहातल्या देशांच्या पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीला उपस्थित होते.

जी 20 बैठकीच्या समारोपप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री यादव यांनी समाजातला असुरक्षित घटक मागे न ठेवता संपूर्ण जगभरामध्ये मजबूत सुधारणा आणि लवचिकतेचे धोरण स्वीकारून संयुक्तपणे कार्य करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. 2030 पर्यंत शाश्वत विकास साध्य करण्याच्या कार्यक्रमाला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले.

भूपेंद्र यादव यावेळी म्हणाले की, शाश्वत पुनर्प्राप्तीतूनही शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने कार्य करणे शक्य आहे. हवामान बदल ही एक जागतिक घटना असली तरी, त्याचे नकारात्मक परिणाम गरीब आणि असुरक्षित लोकांवर विशेषतः विकसनशील देशांमध्ये जास्त तीव्रतेने जाणवतात, यावर भूपेंद्र यादव यांनी आपल्या भाषणामध्ये भर दिला. हे देश नैसर्गिक संसाधनांवर जास्त अवलंबून आहेत, त्याचबरोबर हवामानातील बदलांचा आणि या बदलांमुळे होणा-या टोकाच्या परिणामांचा सामना करण्याची त्यांच्या क्षमता मर्यादित आहेत. हवामन बदलामुळे होणारे  परिणामही त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत. विकसनशील देशांपैकी ज्यांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कमीत कमी योगदान दिले आहे, त्यांनाही वैश्विक तापमान वृद्धीचा प्रभाव सर्वाधिक जाणवणार असून त्याचा जोरदार फटका बसेल. समकालीन पर्यावरणीय आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कोणताही उपक्रम हा राष्ट्रीय परिस्थिती आणि प्राधान्यक्रम यांच्यानुसार ठरविण्यात यावा त्याचबरोबर वेगवेगळ्या जबाबदा-या आणि संबंधित देशांच्या क्षमता या तत्वावर आधारित
असाव्यात.

1 डिसेंबर, 2022 पासून जी 20 चे अध्यक्षपद भारत स्वीकारणार आहे. यानंतर 2023 मध्ये जी 20 ची शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. इंडोनेशियाकडे जी20 चे अध्यक्षपद असताना त्यांच्या अध्यक्षतेखालीच भारतामधल्या विविध शहरांमध्ये बैठका, कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि त्याबरोबरीने भेटींचे कार्यक्रम होणार असल्याचे मंत्री यादव यांनी यावेळी सांगितले.

नोव्हेंबर 2021 मध्ये सीओपी 26 मध्ये वैश्विक नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये भाषण करताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकासाचा नवा मंत्र दिला होता, तो म्हणजे ‘एलआयएफई’ म्हणजेच ‘‘जीवन -पर्यावरणासाठी जीवनशैली’’ आता ‘एलआयएफई’ ही एक जागतिक चळवळ बनविणे आवश्यक बनले आहे. कशाचा विचार न करता आणि विनाशकारी उपभोगापासून दूर जाण्याची गरज असून कोणत्याही गोष्टीचा जाणीवपूर्वक वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऊर्जा सुरक्षा, कमी कार्बन आणि कार्यक्षम औद्योगिक वृद्धी शाश्वत शेती आणि कमी कार्बन उर्त्सजन करीत जीवन जगण्याच्या दिशेने भारत प्रयत्नशील आहे. सर्वांसाठी शाश्वत जीवनशैलीनुसार परिवर्तन घडवून आणण्यासाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत. सर्वांना परवडणारी, सेवायोग्य आणि शाश्वत जीवनशैली सुनिश्चित करण्यासाठी आपण समृद्धीची व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. शाश्वततेसाठी जागतिक सामान्यांसाठी समन्वित कृती गरजेची आहे. यावर भर देवून मंत्री यादव म्हणाले, भारत एक ‘संपूर्ण जगाचा’ दृष्टिकोन आहे. भारत समुदायांचे परस्परावलंबित्व आणि अर्थव्यवस्था जाणून आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाषणाच्या अखेरीस, भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये होणा-या पुढील पर्यावरण प्रतिनिधींच्या बैठकीचे आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या संबंधित कार्यक्रमासाठी सर्व जी 20 देशांना हार्दिक आमंत्रण दिले.

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856077) Visitor Counter : 194