सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) सकल देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज
Posted On:
31 AUG 2022 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, 2022-23 च्या एप्रिल-जून तिमाही (Q1) साठी, दोन्ही स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान किंमतीनुसार सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) चे अंदाज जारी केले आहेत. हे प्रकाशन राष्ट्रीय जमाखर्चाच्या दिनदर्शिकेनुसार करण्यात येत आहे.
- 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी, आर्थिक व्यवहार आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) खर्चाच्या घटकानुसार, सकल मुल्य वर्धनाचे (GVA) मूलभूत किंमतीवर आधारीत त्रैमासिक अंदाजात स्थिर (2011-12) आणि वर्तमान किंमती 1 ते 4 च्या विवरणात दिल्या आहेत.
- वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन किंवा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) स्थिर (2011-12) किंमत Q1 2022-23 मध्ये ₹ 36.85 लाख कोटींची पातळी गाठण्याचा अंदाज आहे, जे Q1 2021-22 मध्ये ₹ 32.46 लाख कोटी होते, जे 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत 20.1 टक्क्यांच्या तुलनेत 13.5 टक्के वाढ दर्शविते.
- Q1 2022-23 मध्ये सध्याच्या किंमतींवर नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादन किंवा सकल देशांतर्गत उत्पादन अंदाजे ₹ 64.95 लाख कोटी आहे, जे Q1 2021-22 मध्ये ₹ 51.27 लाख कोटी होते, जे Q1 2021-2021 मधील 32.4 टक्क्यांच्या तुलनेत 26.7 टक्के वाढ दर्शवते.
- राष्ट्रीय जमाखर्चाचे त्रैमासिक अंदाज हे सूचक आधारित असून विविध मंत्रालये /विभाग/ खाजगी एजन्सींकडून मिळालेला डेटा या अंदाजांच्या संकलनात मौल्यवान माहिती म्हणून काम करतो. पुढील निर्देशांकांचा वापर करून क्षेत्रनिहाय अंदाज संकलित केले आहेत. (i) औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP), (ii) या कंपन्यांसाठी उपलब्ध तिमाही आर्थिक निकालांवर आधारित खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रातील सूचीबद्ध कंपन्यांची आर्थिक कामगिरी (iii) 2022-23 चे पीक उत्पादन उदिष्ट (iv) 2022-23 साठी प्रमुख पशुधन उत्पादनांचे उत्पादन उदिष्ट, (v) मत्स्य उत्पादन, (vi) सिमेंट आणि स्टीलचे उत्पादन /वापर, (vii) रेल्वेसाठी निव्वळ टन किलोमीटर आणि प्रवासी किलोमीटर, ( viii) नागरी विमान वाहतुकीद्वारे हाताळली जाणारी प्रवासी आणि मालवाहतूक, (ix) प्रमुख सागरी बंदरांवर हाताळली जाणारी मालवाहतूक, (x) व्यावसायिक वाहनांची विक्री, (xi) बँक ठेवी आणि कर्ज, (xii) केंद्र आणि राज्य सरकारांची खाती इ. Q1 2022-23 साठी उपलब्ध. अंदाजामध्ये वापरलेल्या मुख्य निर्देशकांमधील टक्केवारीतील बदल परिशिष्टात दिले आहेत.
- सकल देशांतर्गत उत्पादन हे मूळ किमतींवरील एकूण मूल्यवर्धनाची (GVA) बेरजेत उत्पादनांवरील सर्व कर मिसळून, त्यातून उत्पादनांवरील सर्व अनुदाने वजा करून काढले जाते. सकल देशांतर्गत उत्पादन संकलनासाठी वापरल्या जाणार्या एकूण कर महसुलात वस्तू आणि सेवा कर नसलेले महसूल तसेच वस्तू आणि सेवा कर असलेले महसूल यांचा समावेश होतो. उत्पादनांवरील कर आणि सध्याच्या किमतींवरील उत्पादनांवरील अनुदानाचा अंदाज घेण्यासाठी लेखा महानियंत्रक (CGA) आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या वेबसाइटवर उपलब्ध नवीनतम माहितीचा वापर करण्यात आला आहे. उत्पादनांवर स्थिर किंमतींवर आधारित कर मिळविण्यासाठी, कर आकारलेल्या वस्तू आणि सेवांच्या आकारमान वाढीचा वापर करून व्हॉल्यूम एक्स्ट्रापोलेशन केले जाते आणि करांची एकूण मात्रा मिळविण्यासाठी ते एकत्रित केले जातात. महसुली खर्च, व्याज देयके, सबसिडी इत्यादींबाबत लेखा महानियंत्रक (CGA) आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या संकेतस्थळावरील नवीनतम उपलब्ध डेटा, सरकारी अंतिम उपभोग खर्चाच्या (GFCE) अंदाजासाठी वापरण्यात आला आहे.
- स्रोत एजन्सींनी दिलेल्या डेटामधील सुधारित डेटा कव्हरेज आणि त्याच्या नवीन आवृत्तीचा या अंदाजांच्या नंतर प्रकाशित होणाऱ्या आवृत्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वरील कारणांसाठी या अंदांजांची, निर्देशित ठराविक काळानंतर पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. अंदाजामधील आकड्यांचे विश्लेषण करताना वापरकर्त्यांनी हे विचारात घेतले पाहिजे.
- जुलै-सप्टेंबर, 2022 (Q2 2022-23) या तिमाहीसाठी तिमाही सकल देशांतर्गत उत्पादन अंदाजांचे पुढील प्रकाशन 30.11.2022 रोजी होईल.
संपूर्ण प्रसिद्धी पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Annexure
* * *
S.Patil/Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855873)
Visitor Counter : 440