मंत्रिमंडळ
जैवविविधता संवर्धन क्षेत्रात भारत आणि नेपाळ यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
Posted On:
31 AUG 2022 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवविविधता संवर्धनासाठी नेपाळ सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या करारामुळे दोन्ही देशात कॉरिडॉर आणि इंटरलिंकिंग क्षेत्रांची पुनर्बांधणी करणे , दोन्ही देशांत ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे त्याचबरोबर जंगले, वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता संरक्षण आणि हवामान बदल या क्षेत्रात सहकार्य आणि समन्वय मजबूत आणि संवर्धित होईल या कडे लक्ष देण्यात येईल.
हा सामंजस्य करार दोन्ही देशांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी मदत करेल, ज्यामध्ये कॉरिडॉर आणि एकमेकांना जोडणारी क्षेत्रे वृध्दिंगत करणे, ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण यासह वन, वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल या क्षेत्राचा समावेश आहे.
* * *
G.Chipalkatti/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855753)
अभ्यागत कक्ष : 229
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam