कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्तीवेतनधारकांच्या "जीवन सुलभतेसाठी" निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे एकात्मिक निवृत्तिवेतनधारक पोर्टल विकसित केले जाणार
निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारी प्राधान्याने सोडवल्या जातील
Posted On:
30 AUG 2022 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
अमृतसर येथे आयोजित दोन दिवसीय बँकर्स जागरूकता कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते आज करण्यात आले.
निवृत्तीवेतनधारकांना विनाअडथळा सेवा देण्यावर व्ही श्रीनिवास यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भर दिला. या दृष्टीने हा विभाग, एआय/एमएल आधारित एकात्मिक निवृत्तीवेतनधारक पोर्टल विकसित करणे ,निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण पोर्टल 'भविष्य' आणि विविध बँकांचे निवृत्तीवेतन पोर्टलया विभागाशी संलग्न करणे, निवृत्तीवेतनधारक , सरकार आणि बँकर यांच्यात विनाअडथळा संवाद सुनिश्चित करण्यासाठी चॅट बॉटची निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर हा विभाग कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग पीएनबी तसेच इतर बँकांच्या सहकार्याने ही डिजीटल प्रणाली तयार करण्यासाठी एका तंत्रज्ञान चमूची स्थापना करत आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले. प्रक्रिया आणि लोकांशी संबंधित तक्रारींवर पीएनबीच्या माध्यमातून अत्यंत काटेकोरपणे लक्ष दिले जाते . 2014 मध्ये हयातीचा दाखला डिजिटल देण्याची सुरुवात करण्यात आली. हा दाखला आधारकार्डवर आधारित बायो-मेट्रिक उपकरणे, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचे 1,90,000 ग्रामीण डाक सेवक आणि बँकांद्वारे (डोअरस्टेप बँकिंग) घरापर्यंत बँकिंग सेवेद्वारे उपलब्ध होत आहे. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान नोव्हेंबर 2021 मध्ये सुरु करण्यात आले. हे तंत्रज्ञान निवृत्तीवेतनधारकांचा हयातीचा दाखला सादर करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणारे आहे. फिनटेकचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास निवृत्तीवेतनधारकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे “जीवनमान सुलभ” करण्यासाठी, भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन धोरण तसेच निवृत्तीवेतन संबंधित प्रक्रियांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी अनेक कल्याणकारी उपाय योजले आहेत.
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन वितरणाबाबत विविध नियम आणि प्रक्रियांसंदर्भात जागरूकता निर्माण करणे तसेच धोरण आणि कार्यपद्धतींमधील विविध सुधारणांद्वारे वेळोवेळी होणाऱ्या बदलांबद्दल विभागीय पदाधिकाऱ्यांना अद्ययावत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बँक अधिकाऱ्यांना या प्रक्रिया हाताळताना येणाऱ्या समस्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारी समजून घेणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. असे जनजागृती कार्यक्रम बँक अधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855599)
Visitor Counter : 222